राज्यात मृत्यूदरापेक्षा दहा टक्के जास्त रुग्ण होतायेत बरे! पाहा किती आहे कोरोनामुक्ती दर?

Ten percent more than the death rate patients are recovered froma corona in the state
Ten percent more than the death rate patients are recovered froma corona in the state

पुणे : राज्यात कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे चार टक्के रुग्णांचा मृत्यू झाला असली तरीही त्यापेक्षा जास्त दहा टक्के जास्त म्हणजे 14 टक्के कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्यात शनिवारी सकाळपर्यंत सहा हजार 817 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गानंतर त्याला निश्चित औषध नाही, त्यामुळे या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करणे, हाच त्यावरचा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रत्येक संशयीत रुग्णाचा शोध
कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा कसून शोध घेतला जात आहे. त्यांना 14 दिवस विलगिकरण कक्षात ठेवले जाते. त्यांचा कोणतीही लक्षणे नसली तरीही त्यांच्या घशातील द्रव पदार्थाचे नमूने तपसण्यसाठी प्रयोगाशाळेत पाठविले जातात. त्यांचा प्रयोगशाळेतील अहवाल निगेटीव्ह आल्यास त्यांना घरातच विलगिकरणाचा सल्ला दिला जातो. मात्र, झोपडपट्टातील नागरिकांसाठी आता बहुतांश शहरांनी अशा संशयीत रुग्णांना 14 दिवस ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. 

कोरोनामुक्त रुग्णांचे वाढते प्रमाण
कोरोनाबाधीत रुग्णाला 14 दिवस संस्थात्मक विलगिकरण केले जाते. त्यासाठी सरकारी रुग्णालये, महापालिकेचे दवाखाने आणि खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येत आहे. कोरोनाच्या संसर्गानंतरही प्रकृती स्थिर असलेले, तसेच इतर कोणतेही आजार नसलेल्या रुग्णांना फक्त विलगिकरण कक्षात दाखल करून त्यांच्यावर उपचार केला जातो. या उपचारांना प्रतिसाद देत चौदा दिवसांमध्ये त्यांना झालेला विषाणूंचा संसर्ग बरा होतो. त्यानंतर 24 तासांमध्ये त्यांचे दोन नमूने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवितात. ते निगेटिव्ह आल्यास ते कोरोनामुक्त होतात. निरोगी व्यक्ती म्हणून ते रुग्ण विलगिकरण कक्षातून बाहेर पडतात. अशा रुग्णांचे प्रमाण राज्यात 14 टक्के आहे. 

मृत्यूचे प्रमाण 4 टक्के
राज्यात कोरोनाचा मृत्यूदर चार टक्के आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱयांपेक्षा त्यातून खडखडीत बरे होणाऱयांचे प्रमाण जास्त असल्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीच्या विश्वेषणावरून स्पष्ट होते. 

पुणे जिल्ह्यातील अंगणवाडीच्या बालकांसाठी मोठा निर्णय! 

साडेपाच हजार रुग्ण उपचाराखाली 
राज्यात आतापर्यंत निदान झालेल्या सहा हजार 817 रुग्णांपैकी 301 (4 टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या 31 जिल्ह्यांमधील 957 (14 टक्के) कोरोनामुक्त झाले आहेत. तर, उर्वरित पाच हजार 559 रुग्णांवर (82 टक्के) वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com