Video : लेक लाडकी.. स्त्री जन्माचे 'या' शाळेने केले अनोखे स्वागत!

ghavande village.jpg
ghavande village.jpg

इगतपुरी : पहिली बेटी अन् धनाची पेटी असं फक्त सामाजिक स्तरावर बोललं जातं, मुलगा जन्माला आला तर कुटुंबात पेढा वाटत आनंद व्यक्त केला जातो. परंतु आता विचारांच्या प्रगतीमुळे आणि सामाजिक समरसतेमुळे  मुलांबरोबर मुलीलाही तोच बहुमान देण्याचा प्रयत्न इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील गव्हांडे आदीवासी कुटुंबात जन्माला आलेल्या एका कन्यारत्नाचा व मातेचा सन्मान करुन एक वेगळी सामाजिक शिकवण येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी देत अनोखा व अनुकरणीय असा संदेश दिला आहे.
 
गव्हांडे गावात शिक्षकांनी केले स्त्री जन्माचे अनोखे स्वागत
बेटी बचाव, बेटी पढावचा नारा आज सर्वत्र होत असला तरीही अनेक ठिकाणी नकोशीचा नारा ऐकूच येतो. मात्र इगतपुरी तालुक्यात आदीवासी दुर्गम भागातील एका परिवारात जन्माला आलेल्या स्त्री जन्माचे अनोखे स्वागत व सन्मान करून एक वेगळा आदर्श उभा केला आहे .लक्ष्मी आली घरा तोची दिवाळी दसरा या न्यायाने मुलगी जन्माला आली म्हणून मुलीच्या घरापासुन ते शाळेपर्यत त्या बालिकेच्या आईसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यामुळे या अनुकरणीय व कौतुकास्पद उपक्रमाचे नुसते गावात ,केंद्रात बीटातच  नव्हे तर  तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे.
 

आदीवासी कुटुंबात कन्यारत्न जन्माला आल्याने सवाद्य मिरवणूक 
मुलगा जन्मला आला तर कोणत्याही  कुटुंबात आनंद व्यक्त केला जातो. त्याबरोबरच नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरे होतात. मात्र मुलगी जन्माला आली तर ती नकोशी वाटते ही प्रत्येक समाजात एक धारणा निर्माण झाली आहे.  मात्र मुलीच्या जन्माचे स्वागत करणारे दाम्पत्य  आजकाल खरे भाग्यवान समजले जातात. मात्र यात आता गावातील शिक्षकांनी पुढाकार घेतल्याने त्याला वेगळी चालना मिळणार आहे. घरची बेटी धनाची पेटी ,लेक लाडकी या घराची त्यातच आनंद मानणारे कुटुंबिय आणि गावात ज्ञानाचे अमृत पाजणारे शिक्षक आता मुलीच्या जन्माचे समर्थन करत आनंदोत्सव करू लागले आहेत. त्यामुळे वेगळ्या आनंदाची अनुभुती आली आहे .
 

समाजाच्या विशिष्ट धारणेला फाटा  
 गव्हांडे येथील कुटुंबीय असलेले सोमा रामा भगत व पुनम सोमा भगत या दाम्पत्याला दोन दिवसांपूर्वी कन्यारत्न जन्माला आल्याने संपूर्ण गावात व भगत कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला मुलाच्या जन्माचे स्वागत होते तर मुलीच्या जन्माचे स्वागत झालं पाहिजे अशी भावना शाळेत यावेळी उमटली आणि ती प्रत्यक्षात अवतरण्यात सुध्दा आणली व त्यानुसार नवजात मुलीला ड्रेस ,दुपटे ,सॉक्स,टोपी व आईला माहेरची बोळवण म्हणुन शिक्षक संजय येशी यांनी साडी भेट दिली व अनोखा उपक्रम राबवला यामुळे भगत परिवार या आदरआतिथ्याने अक्ष:रशा भारावला होता. या उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे ,शिक्षण विस्तार अधिकारी अशोक मुंढे,केंद्रप्रमुख श्रीराम आहेर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊ दरवडे ,मुख्याध्यापक संजय कोळी ,विजय पगारे,प्रकाश सोनवणे , धनंजय सरक ,निवृत्ती नाठे ,सुनील सांगळे,मनिषा वाळवेकर ,तुषार धांडे,अनिल शिरसाठ ,तुकाराम खादे,अतुल आहिरे ,आदीनी अभिनंदन केले आहे 
      

प्रत्येक स्त्री जन्माचे स्वागत करणार
 शाळेमार्फत हा उपक्रम पहील्यांदाच राबवला गेला मात्र हा उपक्रम शाळेचा उपक्रम न राहता तो आता या पुढे गावात जन्माला आलेल्या मुलींचे शाळेकडून स्वागत करण्यात येणार आहे. भविष्यात या मुलांसाठी राबवण्यात येत असणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शाळा पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहे असे यावेळी उपक्रमशील शिक्षक संजय येशी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com