महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच RSS च्या मध्यस्थीने सुटणार?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उभयांमध्ये चर्चा झाल्याचे कळतंय.  फडणवीस आणि मोहन भागवत यांच्यात 1 तास 20 मिनिटे चालली चर्चा असंही समजतंय.  

नागपूर :  भाजपच्या कोअर समितीची बैठक आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर गाठून संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उभयांमध्ये चर्चा झाल्याचे कळतंय.  फडणवीस आणि मोहन भागवत यांच्यात 1 तास 20 मिनिटे चालली चर्चा असंही समजतंय.  

मुख्यमंत्री रात्री नऊ वाजताच्या सुमारास विमानाने नागपूरला दाखल झाले. तेथून ते थेट संघ मुख्यालयात गेले. रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते मुख्यालयातून बाहेर पडले. मुख्यमंत्र्यांनी सरसंघाचालकांची भेट घेतली असली तरी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यास कुठलाच दुजोरा मिळू शकला नाही. मात्र राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादात संघाने मध्यस्थी करावी, अशी विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री आले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. 

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाला समकक्ष यंत्रणा उभारणार?

भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर युतीचे सरकार स्थापन होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी शिवसेनेला प्रस्तावसुद्धा मागितला आहे. मात्र शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी अडूण बसले आहे. त्यांनी लातूर येथे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असा दावा केला.

भारतात 'या' शहरातील तरुण सर्वात आधी गमावतात आपली व्हर्जिनिटी..

दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा "फिफ्टी-फिफ्टी'चे स्मरण देऊन भाजपलाच प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. शिवसेना एक पाऊलही मागे घेण्यास तयार नाही. उद्या देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला तरी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. शिवसेनेने साथ दिली नाही तर सरकार पडण्याची नामुष्की ओढावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालकांची भेट घेण्यासाठी आल्याचे चर्चा आहे.

भाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंना शरद पवार आणणार एकत्र ?

विशेष म्हणजे सोमवारी फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचीसुद्धा भेट घेतली.

WebTitle : devendra fadanavis met RSS sarsanghachalak mohan bhagawat


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanavis met RSS sarsanghachalak mohan bhagawat