माजी सैनिकांसाठी चांगली बातमी: राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

100 per cent income tax exemption for ex-servicemen and wives of deceased ex-servicemen.jpg
100 per cent income tax exemption for ex-servicemen and wives of deceased ex-servicemen.jpg

पुणे : राज्यातील माजी सैनिक आणि दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नींना मिळकतकर १०० टक्के माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्षापासून केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करत असलेल्या सर्व माजी सैनिकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात असलेल्या माजी सैनिकांना यापुढे मिळकतकर भरावा लागणार नाही. मिळकतकर माफीबाबतची बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याआधी ग्रामीण आणि शहरी भागातील माजी सैनिकांना मिळकत करात अंशतः सूट देण्यात येत होती. याबाबत दोन्ही भागासाठी प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन स्वतंत्र अध्यादेश काढण्यात आले होते; परंतु आता हे दोन्ही आदेश रद्द करून शहरी व ग्रामीण भागातील माजी सैनिकांसाठी एकच योजना लागू करण्यात आला आहे. या योजनेला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.

देशासाठी प्राणाची बाजी लावून माजी सैनिकांनी काम केलेले असते. त्यांचे हे कार्य विचारात घेऊन महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिक व दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नींचा मिळकतकर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांना अंशतः सूट देणारा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता. त्याबाबतचा अध्यादेश २० ऑगस्ट २०२० ला काढण्यात आला होता. त्यानंतर शहरी भागात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांना मिळकतकरात अंशतः सूट देणारा अध्यादेश नगरविकास विभागाने ९ सप्टेंबरला २० काढला होता. हे दोन्ही स्वतंत्र निर्णयाचे एकत्रीकरण करत ही नवीन माजी सैनिक सन्मान योजना चालू करण्यात आली आहे.

पिंगळे वस्ती आग लागल्याने महावितरणच्या केबल जळून खाक 

मिळकतकर माफीसाठी पात्रता निकष
- माजी सैनिक हा राज्यातील रहिवासी असावा
- अधिवास (रहिवासी) प्रमाणपत्र सादर करावे लागणार
- जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अनिवार्य
- केवळ एकाच मिळकतीसाठी करमाफी मिळणार
- माजी सैनिक व त्यांची पत्नी हयात असेपर्यंतच करमाफीचा लाभ मिळणार
- अविवाहित माजी सैनिकांना आईवडील हयात असेपर्यंतच लाभ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com