esakal | भाजपला धक्का; राज्यसभा खासदारांसह १२ आमदार सोडणार पक्ष?
sakal

बोलून बातमी शोधा

12 BJP mla and 1 mp likely to quit party

भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तिवण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी संकेतस्थळासोबतच काही वृत्तवाहिन्यांनीही दिले आहे. भाजपचे 12 विद्यमान आमदार आणि एक राज्यसभा खासदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. 

भाजपला धक्का; राज्यसभा खासदारांसह १२ आमदार सोडणार पक्ष?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तिवण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी संकेतस्थळासोबतच काही वृत्तवाहिन्यांनीही दिले आहे. भाजपचे 12 विद्यमान आमदार आणि एक राज्यसभा खासदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक करत सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे पक्षांतर करून फसलेले आमदार पुन्हा आता सत्ताधारी पक्षाच्या संपर्कात आहेत.

भाजपतील डझनभर आमदार फुटीवर आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला शक्तीहीन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात मेगाभरती केली. मात्र आता याच मेगाभरतीचं भाजपवर बुमरँग होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात आणखी मोठी राजकीय उलथापालथ घडणार असल्याचे दिसत आहे.

महिला मंत्र्यांचा 'या' गाण्यावर तुफान डान्स

भाजपच्या 12 आमदारांसह एक राज्यसभा खासदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. हा खासदार राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय. त्यामुळे भाजपचा नाराज राज्यसभा खासदार कोण, अशी चर्चा रंगू लागली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपच्या 7 आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना फोन केल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी झाली होती. या आमदारांनीही आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. अजित पवारांना फोन करणारे सातपैकी 2 आमदार सातारा जिल्ह्यातील तर एक आमदार पुणे जिल्ह्यातील असल्याचं बोललं जात आहे.