esakal | राज्यात यंदाच्या पावसाळ्यात १७ लाख हेक्टर शेतीचं नुकसान, ४३० मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

rains

राज्यात यंदाच्या पावसाळ्यात १७ लाख हेक्टर शेतीचं नुकसान, ४३० मृत्यू

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : गेल्या चार महिन्यात राज्यात झालेल्या पावसामुळं आत्तापर्यंत १७ लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं आहे. तर एकूण ४३० जणांचा मृत्यू झाला असून १३६ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. यंदाच्या पावसाळ्यात राज्यभरात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा: Exclusive: "तातडीनं मदत द्या, अन्यथा दिवाळीला दिव्यांऐवजी चिता पेटतील"

वडेट्टीवर म्हणाले, गेल्या चार महिन्यात काही ठिकाणी १७० ते १९० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. त्याचबरोबर ४३६ लोक वाहून गेले यांपैकी ४३० जणांचे मृतदेह हाती आले तर अद्याप ६ जण बेपत्ता आहेत. तसेच १३६ जण यामध्ये जखमी झाले आहेत. तसेच गेल्या चार महिन्यात राज्यात झालेल्या पावसामुळं आत्तापर्यंत १७ लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं आहे.

नुकत्याच झालेल्या पावसात NDRF-SDRF नं बचाव कार्य राबवलं

काल-परवाच्या पावसामध्ये उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद या ठिकाणी एनडीआरएफ तर जळगावमध्ये एसडीआरफची टीम मदतीसाठी पाठवण्यात आली होती. या बचाव कार्यात उस्मानाबादमधून हेलिकॉप्टरच्या मदतीनं १६ लोकांना तर बोटीद्वारे २० लोकांचा वाचवण्यात आलं. लातूरमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीनं ३ लोकांचे प्राण वाचवण्यात आले. तर बोटीतून ४७ लोकांना बाहेर कढाण्यात आलं. औरंगाबादमध्ये २४ लोकांना बोटीद्वारे बाहेर काढण्यात आलं.

या महिन्यात १९६ मोठ्या जनावरांचा मृत्यू

या सप्टेंबर महिन्यात आत्तापर्यंत ७१ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे २६ लोक जखमी झालेत. ९७ जणावरांचा वीज पडून तर १९६ मोठ्या जनावरांचा या महिन्यात मृत्यू झाला. ३१ जिल्ह्यांत या चार महिन्यात अतिवृष्टीमुळं १७ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचं नुकसान झालं आहे. सरासरी ८१ टक्के आत्तापर्यंत पंचनामे झाले आहेत. संततधार पावसामुळं पंचनाम्यात अडचणी येत होत्या. अद्याप १९ टक्के पंचनामे बाकी आहेत. काल परवा दोन दिवसांत जो पाऊस झाला गुलाब चक्रीवादळामुळे त्याची माहिती घेतली जात आहे. यासाठीचेही पंचनामे केले जातील.

एकाच भागात सुमारे आठ वेळा अतिवृष्टी

५२ तलाठी विभागात ३८१ महसूल युनिटमध्ये अतिवृष्टी झाली. यांपैकी १२७ युनिटमध्ये चार-चार वेळा अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी आठ वेळा अतिवृष्टी झाली म्हणून हे प्रचंड नुकसान झाल आहे. यामध्ये रस्त्यांच नुकसान झालंय, शेतीपंप वाहून गेलेत. जमीनी मोठ्या प्रमाणावर खरडून गेल्या. नदी आणि नाल्यांनी प्रवाह देखील बदलला गेला आहे.

loading image
go to top