Ahmednagar : अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकलं, जव्हारमधील धक्कादायक घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jhawar Police

दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Ahmednagar : अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकलं, जव्हारमधील धक्कादायक घटना

जव्हार : गेली महिनाभर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar Districts) श्रमजीवी संघटनेनं मालक सावकारांची आणि मुलं खरेदी करून त्यांना राबवणाऱ्या धनगरांची पार दाणादाण उडवली आहे. या सावकारी वृत्तीच्या लोकांनी ठाणे, नाशिक, पालघर जिल्ह्यातील गरीब कातकरी मजुरांच्या दारिद्र्य आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या कोवळ्या बालकांना 500-1000 रुपये देऊन अक्षरशः गुलाम म्हणून खरेदी केलं होतं.

नाशिक-नगर जिल्ह्यातील या घटना ताज्या असतानाच जव्हार येथील मुलगी आणि भिवंडी तालुक्यातील 2 मुलांना श्रमजीवी संघटनेनं मुक्त केलं असून तीन वेगवेगळ्या गुन्ह्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा नरेश भोये आणि काळू नरेश भोये अशी या अल्पवयीन मुलींची नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपाळाकडं मनीषा 3 वर्षांपासून तर काळू एक वर्षापासून बालमजुरी करत होती. मागील काही वर्षांपासून या दोन्ही चिमुकल्या या मेंढपाळाकडं मेंढ्यांची साफसफाई, घरगुती काम, मेंढ्यांसोबत गुराखी जाण अशा विविध कामांवर राबवल्या जात होत्या.

हेही वाचा: Muslim Couples : वाह.. क्या बात है! मुस्लिम दाम्पत्यानं हिंदू मंदिराला दान केली 'इतकी' मोठी रक्कम

मेंढपाळाविरोधात गुन्हा दाखल

या बदल्यात त्यांना वर्षाकाठी 12 हजार रुपये आणि एक मेंढी देण्याचं आश्वासन मेंढपाळाकडून देण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात वर्षाला अवघे पाचशे रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या प्रकरणाची श्रमजीवी संघटनेनं पुढाकार घेत दखल घेतली. अखेर मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळा विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात कलम 3(1) अंगर्गत गुन्हा दाखल झाला असून आठ वर्षीय मनीषाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. तर, सहा वर्षीय काळू भोये हिचा जव्हार पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती जव्हार पोलिसांकडून (Jhawar Police) देण्यात आली आहे.

हेही वाचा: आमचा एकही आमदार नाराज नाही, उलट राष्ट्रवादीची मंडळी शिंदे गटाच्या संपर्कात; देसाईंचा गौप्यस्फोट

Web Title: 2 Minor Girls Sold For Child Labor For Just Rs 500 Incident In Jawhar Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..