Gas supply: महाराष्ट्रात LPG कोट्यात 20% वाढ! छगन भुजबलांची मोठी घोषणा; मात्र एक अटही लागू होणार, कोणती अन् कधीपासून?

Maharashtra Commercial gas supply: महाराष्ट्रात व्यावसायिक एलपीजी गॅस कोट्यात २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हॉटेल्स आणि ढाब्यांना प्राधान्य मिळेल. नवीन मार्गदर्शक तत्त्वे २३ मार्चपासून लागू होतील.
Maharashtra Commercial gas supply

Maharashtra Commercial gas supply

ESakal

Updated on

जागतिक अशांतता आणि पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील हॉटेल आणि खाद्य व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे की, केंद्र सरकारने राज्यात व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा वाढवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून गॅसच्या तुटवड्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या हॉटेल्स आणि ढाब्यांसाठी हा निर्णय जीवनदायी ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com