Melghat : कृषीमंत्री अब्दुल सत्तार मेळघाट दौऱ्यावर असताना 26 वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dharani Taluka Crime News

कृषीमंत्री अब्दुल सत्तार मेळघाट दौऱ्यावर आले आहेत.

Melghat : कृषीमंत्री अब्दुल सत्तार मेळघाट दौऱ्यावर असताना 26 वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या

धारणी : माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राज्याच्या कृषी विभागातर्फे राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) साद्राबाडी इथं शेतकऱ्याच्या घरी मुक्कामी असतानाच तेथून पाच किलोमीटर अंतरावरील लाकटू गावातील युवा आदिवासी शेतकऱ्यानं सततच्या नापिकी, अतिवृष्टी व कर्जाला कंटाळून विषप्राशन करून आपलं जीवन संपविलं.

अनिल सुरजलाल ठाकरे (वय २६), असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. कृषिमंत्र्यांचा दौरा असतानाच आदिवासी शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानं शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी, या उपक्रमाची सुरुवात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मेळघाटच्या धारणी तालुक्यातील साद्राबाडी गावातून केली. रात्री कृषिमंत्र्यांनी साद्राबाडी येथील शेतकरी कुटुंबाच्या घरी मुक्कामी राहून व तेथेच जेवण करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. परंतु तेथून पाच किलोमीटर अंतरावरील लाकटू गावातील युवा आदिवासी शेतकरी अनिल ठाकरे यांनी सततची नापिकी, अतिवृष्टी व कर्जाला कंटाळून विषप्राशन करून आपले जीवन संपविले.

हेही वाचा: US : भारतीय-अमेरिकन डॉक्टरानं PM मोदी, CM जगन मोहन रेड्डी, अदानींविरोधात दाखल केला खटला

शेतकरी अनिल ठाकरे यांच्या जवळ सामूहिक सहा एकर शेती असल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली असून, तो घरातील एकटा कमविणारा व्यक्ती होता. अनिलने काही वर्षांअगोदर कर्जावर ट्रॅक्टर घेतला होता. या ट्रॅक्टरच्या साहाय्याने स्वतःची शेती करीत होता. परंतु, नापिकीमुळे ट्रॅक्टरच्या कर्जाचे हप्ते त्याला फेडता आले नाही. कर्जदार सतत घरी येत असल्याने तो चिंतित होता, अशी माहिती अनिल ठाकरे यांच्या आई-वडिलांनी दिली. अनिल ठाकरे याने ३१ ऑगस्टला सकाळी राणापिसा गावाच्या फाट्याजवळ विषप्राशन केले असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. सततची नापिकी, अतिवृष्टी व प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली, असे अनिलचे वडील सुरजलाल ठाकरे यांनी सांगितले. अनिल यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, दोन बहिणी, दोन वर्षांचे बाळ असून त्यांच्यावर खासगी कंपनीचे मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

मेळघाटात येऊन कृषिमंत्री नौटंकी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या घरी राहणे, जेवण करणे यामुळे त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. कृषिमंत्री दौऱ्यावर असल्यानंतरही एक युवा आदिवासी शेतकरी आत्महत्या करतो, यातच शेतकऱ्यांची स्थिती दिसून येते. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची गरज आहे. तथापि, आत्महत्याग्रस्त अनिल ठाकरे याला कर्जमुक्त करून त्याच्या कुटुंबाला शासनाने ५० लाखांची मदत करावी.

-शैलेंद्र मालविया, तालुकाप्रमुख शिवसेना

Web Title: 26 Year Old Young Farmer Committed Suicide While Agriculture Minister Abdul Sattar Was On Visit To Melghat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..