Sugarcane : राज्यात ३४० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप; आतापर्यंत २९४ लाख क्विंटल साखर उत्पादन

राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मिळून चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात आजअखेरपर्यंत (ता.२८) एकूण ३४०.४३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.
Sugar Factory
Sugar Factoryesakal

पुणे - राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मिळून चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात आजअखेरपर्यंत (ता.२८) एकूण ३४०.४३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. राज्यात सर्वाधिक ७७.२१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप हे पूर्ण विभागात पूर्ण झाले आहे. आतापर्यंतच्या एकूण ऊस गाळपातून २९३.८१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. दरम्यान, यंदा सरासरी उताऱ्यात ०.५७ टक्क्यांनी घट झाली आहे.

गेल्या वर्षीच्या आज अखेरपर्यंतच्या गळीत पूर्ण झालेल्या उसाच्या तुलनेत यंदा ७६.७८ लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत एकूण ४१७.२१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते. दरम्यान, यंदा साखर उत्पादनही ९० लाख १० हजार क्विंटलने कमी झाले आहे. गेल्या वर्षी आजअखेरपर्यंत ३८३.९१ लाख क्विंटल इतके साखर उत्पादन झाले होते.

यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत एकूण १९४ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरु केले आहे. यामध्ये ९५ सहकारी आणि ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. शिवाय साखर उताऱ्यातही घट झाली असून, राज्याचा सध्याचा सरासरी साखर उतारा हा ८.६३ टक्के इतका आहे. गतवर्षी हाच साखर उतारा हा ९.२० टक्के इतका होता.

यावरून यंदा साखर उताऱ्यात ०.५७ टक्क्यांनी घट झाली असल्याचे दिसून आले आहे. साखर आयुक्तालयाच्या वतीने आज यंदाच्या ऊस गळीत हंगामाची सद्यःस्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्याच्या टक्केवारीत आघाडी घेतली असून, येथील साखर उताऱ्याची टक्केवारी राज्यात सर्वाधिक ९.८३ टक्के इतकी आहे. नागपूर विभागातील साखर उताऱ्याची टक्केवारी ही सर्वात कमी म्हणजे केवळ २.५८ टक्के इतकी आहे.

आतापर्यंत ऊस गाळप सुरु केलेल्या एकूण कारखान्यांमध्ये कोल्हापूर विभागातील ३७, पुणे विभागातील २९, सोलापूर विभागातील ४७, नगर विभागातील २५, छत्रपती संभाजीनगर विभागातील २२, नांदेड विभागातील २९, अमरावती विभागातील दोन आणि नागपूर विभागातील तीन साखर कारखान्याचा समावेश आहे.

विभागनिहाय पूर्ण झालेले उसाचे गाळप (मेट्रिक टनमध्ये)

- कोल्हापूर --- ६९.९४ लाख मेट्रिक टन

- पुणे --- ७७.२१

- सोलापूर --- ७४.४२

- नगर ---४४.०१

- छत्रपती संभाजीनगर ---३२.२३

- नांदेड --- ३८.९९

- अमरावती --- ३.०१

- नागपूर --- ०.६२

विभागनिहाय आजअखेरचे साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)

- कोल्हापूर --- ६८.७३ लाख

- पुणे --- ६८.४१ लाख

- सोलापूर --- ५९.०९ लाख

- नगर --- ३७.४४ लाख

- छत्रपती संभाजीनगर --- २३.७९ लाख

- नांदेड --- ३३.५७ लाख

- अमरावती --- २.६ लाख

- नागपूर --- ०.१६ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com