
राज्यातील 372 आमदार, खासदारांनी थकवले लाखोंची वीजबिलं
मुंबई : एकीकडे वेळोवेळी वीजबीलं भरुनही लोडशेडिंगमुळे सारख्या गोष्टीला सामान्य नागरिकांना सामोरे जावं लागत आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांनी लाखो रुपयांची बिलं थकवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, रावसाहेब दानवे, संभाजीराजे यांच्यासह जवळपास 372 आमदार, खासदार, मंत्र्यांची एक कोटींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. 30 एप्रिल 2022 पर्यंत राज्यातील अतिमहत्वाच्या आमदार-खासदार आणि मंत्री असे 372 ग्राहकांची एक कोटी 27 लाखांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ऊर्जा विभागाने यादी जाहीर केली आहे. (372 Ministers Of State Electricity Bill Pending )
हेही वाचा: ''कोणीही येणार अन् भोंगे काढायला सांगणार, हुकुमशाही आहे का?''
याबाबत ऊर्जा विभागाने यादी जाहीर केली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, संभाजीराजे, भाजप नेते रावसाहेबर दानवे, अनिल देशमुख, राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदारांच्या नावाचा समावेस आहे. ऊर्जा विभागाच्या यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे 25 हजार, राजेश टोपेंकडे 4 लाख, वळसे-पाटील याच्याकडे 3 हजार 541 रुपयांचे वीजबिल थकीत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, बाळासाहेब थोरात यांच्याकडे 10 हजार, नाना पटोले यांच्याकडे 2 लाख 63 हजार तर, विश्वजीत कदम यांच्याकडे एकूण 20 हजारांचे वीजबिलं थकीत आहे. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे जवळपास 7 लाखांचे वीजबिलं अद्याप थकीत असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या तुरुंगात असलेल्या अनिल देशमुखांकडे 2 लाख 25 हजारांचे बिल थकीत आहे.
दरम्यान, उर्जा विभागने जाहीर केलेल्या या यादीनंतर शेतक-यांच्या वीज बिलावरुन वेळोवेळी भाष्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून लाखोंची थकबाकी कशी वसूल करणार असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
Web Title: 372 Minister Mp And Mla Light Bill Pending In Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..