''कोणीही येणार अन् भोंगे काढायला सांगणार, हुकुमशाही आहे का?'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse-Patil

''कोणीही येणार अन् भोंगे काढायला सांगणार, हुकुमशाही आहे का?''

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या विविध घटना बघता राज्याची प्रतिमा बिघडवण्याचा काही जणांचा प्लॅन असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे आणि भाजपचे नाव न घेता केला आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्यांबाबत आणि राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसाच्या मुद्द्यांवरदेखील परखडपणे मतं व्यक्त केली. राज्यात मुलभूत प्रश्नांबाबत आंदोलन न करता इतर विषय घेवून आंदोलनं केली जात असून, राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात असल्याचे ते म्हणाले. राज्यात मुलभूत प्रश्नांबाबत आंदोलन न करता इतर विषय घेवून आंदोलनं केली जात असून, राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात असल्याचे ते म्हणाले. (Dilip Walse Patil On State )

हेही वाचा: शिवजयंती मिरवणुकीला 'भाजप'चा रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न, शिवसेनेचा आरोप

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या विविध मुद्यांवरील आंदोलनानंतरही कायदा आणि सुव्यवस्था शाबूत अससल्याचे वळसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. या सर्वांममध्ये पोलीस त्यांचे काम योग्य पद्धतीने करत असल्याचेीह त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विरोधी पक्ष त्यांचे काम करत आहेत. मात्र, यातून राज्यात केवळ आणि केवळ अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा: सिलेक्टिव्ह कारवाया नाहीत, वळसे पाटलांचा राणा दाम्पत्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया

हनुमान चालिसा पठनावरून अटक करण्यात आलेल्या राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला यावर बोलताना ते म्हणाले की, राणांवर रोजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला हे वरील कोर्टात पटवून देऊ असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राजद्रोहाचं कलमच राहिले नाही तर त्याचा कुणी गैरवापर करणार नाही. त्यामुळे राजद्रोहाच्या कलमाबाबत केंद्रानेच गाईडलाईन ठरवणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.

राज्यात कृषी आणि औद्योगिक क्षेत्रासंदर्भात अनेक प्रश्न आहेत मात्र, त्यावर कुणीच बोलत नाहीये. त्यामुळे महागाईसारख्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. मात्र, सध्या राज्यात मूलभूत प्रश्नांवर न बोलता इतर बाबींवर आंदोलनं केले जात असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा: 'किआन' अमित ठाकरे; राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाचा अर्थ काय?

राज ठाकरेंवरील पोलिसांचा निर्णय योग्य

मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच औरंगाबाद येथे जाहीर सब पार पडली. यामध्ये त्यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांच्या अनेक विधानांनंतर त्यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाख करण्यात आला. पोलिसांकडून करण्यात आलेली ही कारवाई योग्य असल्याचे मत यावेळी वळसे पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच प्रत्येकाने कायद्याचा आदर ठेवावा असे ते म्हणाले. महाराष्ट्रासमोर आनेक प्रश्न असताना राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा काढला. त्यात आता कुणी डिक्टेटर असल्यासारखं अल्टिमेटम द्यायला लागले. त्यानंतर कारवाई केली तर पोलीस दलावर आणि राज्यसरकारवर प्रश्न उपस्थित करायचे ही भूमिका योग्य नाही.

राज ठाकरे यांच्याबाबत औरंगाबाद पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे. कोणीही येणार आणि भोंगे काढायला सांगणार, राज्यात हुकुमशाही आहे का? कोणीही धमकी द्यायची आणि सरकारने ते सहन करायचे, हे चालणार नाही, असा इशाराच दिलीप पळसे पाटील यांनी यावेळी दिला.

Web Title: Some People Plan To Disturb State Image Says Home Minister Dilip Walse Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top