Maharashtra Police: राज्यातील ५१ सहायक पोलीस निरीक्षकांची उच्च न्यायालयात धाव

- सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश ; 51 Assistant Police Inspectors of the Maharashtra Police Force have approached the High Court claiming that the government has denied them promotion to the post of Police Inspector citing the order of MAT.
Maharashtra Police: राज्यातील ५१ सहायक पोलीस निरीक्षकांची उच्च न्यायालयात धाव

सेवाज्येष्ठता असूनही सरकारने मॅटच्या आदेशाचे कारण पुढे करत पोलीस निरीक्षक पदावर बढती देण्यापासून डावलले असा दावा करत महाराष्ट्र पोलीस दलातील ५१ सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील सहायक पोलीस निरीक्षकांनी मॅटच्या आदेशाला आव्हान दिले असून या याचिकेवर ५ फेब्रुवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान न्यायालयाने याचिकेची दखल घेत सरकारला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

Maharashtra Police: राज्यातील ५१ सहायक पोलीस निरीक्षकांची उच्च न्यायालयात धाव
Police Sport Competition : नाशिकमध्ये राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा; रविवारपासून प्रारंभ

राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात गेल्या १० वर्षांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर काम करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे १०२ च्या बॅचचे अधिकारी असून सरकारने मॅट च्या आदेशाचे कारण पुढे करत पदोन्नती देण्यास त्यांना डावलले. आमच्यावर अन्याय झाला असून मॅटचा आदेश रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ऍड सुरेश माने यांच्यामार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी याचिका दाखल केली असून या याचिकेवर न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

Maharashtra Police: राज्यातील ५१ सहायक पोलीस निरीक्षकांची उच्च न्यायालयात धाव
Nashik Police Transfer : नाशिक ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट! अधीक्षक उमाप यांनी जाता-जाता केले फेरबदल

या सुनावणीवेळी ऍड. अनिल साखरे यांनी सरकारचे चुकीचे धोरण तसेच मॅटच्या आदेशाकडे लक्ष वेधले. खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेत सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले व याचिकेवरील सुनावणी ५ फेब्रुवारी पर्यंत तहकूब केली.

पोलिसांची मागणी काय?

सहाय्यक पोलीस निरीक्षक हे थेट निवड प्रक्रियेतून रुजू झाले. १९९५ च्या पोलीस नियमावलीनुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्यावर्षी आरक्षण नाही म्हणून पदोन्नतीच्या यादीतून त्यांची नावे वगळण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आम्हाला आरक्षणाच्या आधारे नको, तर सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस निरीक्षक पदावर बढती द्या, अशी मागणी याचिकाकर्त्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे

Maharashtra Police: राज्यातील ५१ सहायक पोलीस निरीक्षकांची उच्च न्यायालयात धाव
Police Transfers: नवी मुंबई पोलिस दलातील ६०अधिकाऱ्यांच्या झाल्या अंतर्गत बदल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com