‘रे नगर’मध्ये ६ शाळा अन्‌ ४० मिनी अंगणवाड्या! CEO मनीषा आव्हाळेंचा पुढाकार; शिक्षक व अंगणवाडी सेविकापदी ‘या’ उमेदवारांना संधी

देशातील आवास योजनेचा ड्रिम प्रोजेक्ट सोलापुरातील ‘रे नगर’ येथे ३० हजार घरे साकारली जात आहेत. पहिल्या टप्प्यात १५ हजार घरकुले पूर्ण होतील. रे नगरातील चिमुकल्यांसाठी ४० मिनी अंगणवाड्या आणि जिल्हा परिषदेच्या सहा शाळा सुरु केल्या जाणार आहेत.
solapur zp ceo manisha awhale
solapur zp ceo manisha awhalesakal

सोलापूर : देशातील आवास योजनेचा ड्रिम प्रोजेक्ट सोलापुरातील ‘रे नगर’ येथे ३० हजार घरे साकारली जात आहेत. पहिल्या टप्प्यात १५ हजार घरकुले पूर्ण होतील. रे नगरातील चिमुकल्यांसाठी ४० मिनी अंगणवाड्या आणि जिल्हा परिषदेच्या सहा शाळा सुरु केल्या जाणार आहेत.

रे नगर हौसिंग सोसायटीत केंद्र सरकारच्या आवास योजनेतून ३० हजार घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांच्या लोकापर्णसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे.

नोव्हेंबरअखेर १५ हजार घरांचे बांधकाम पूर्ण व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात बैठक घेऊन संबंधितांना दिल्या आहेत. रे नगरात सुरु होणाऱ्या मिनी अंगणवाड्यांमध्ये ४० मिनी सेविकांची नेमणूक केली जाणार आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण ते पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असलेल्या त्याच ठिकाणच्या महिलांना सेविका म्हणून संधी मिळणार आहे. दरम्यान, समग्र शिक्षा अभियानातून निधीसाठी पाठविलेल्या प्रस्तावात काही त्रुटी राहिल्या असून त्या त्रुटींची पूर्तता करून तो प्रस्ताव पुन्हा पाठविण्याची कार्यवाही सध्या सुरु असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.

मुलांच्या शिक्षणाची होईल दर्जेदार सोय

रे नगर प्रकल्पातील चिमुकल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्यासाठी परिसरात शाळांची सोय असावी, या हेतूने त्याठिकाणी ४० मिनी अंगणवाड्या उभारल्या जात आहेत. तसेच त्याठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत पहिली ते सातवीपर्यंतच्या सहा शाळा सुरु केल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने युद्धपातळीवर कार्यवाही सुरु आहे.

- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

‘समग्र शिक्षा’तून केंद्राला १२ कोटींचा प्रस्ताव

समग्र शिक्षा अभियानातून रे नगर प्रकल्पाच्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकूण सहा शाळांची उभारली केली जाणार आहे. त्यात तीन उर्दु तर तीन मराठी माध्यमाच्या शाळा असतील. त्यासाठी केंद्र सरकारकडून १२ कोटींचा निधी मिळावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तत्पूर्वी, शिक्षण आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठवून त्याठिकाणच्या नवीन शिक्षक भरतीतून शिक्षक घेण्याचीही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांना त्याठिकाणी नेमण्याचेही नियोजन आहे.

‘रे नगर’साठी ५०० रुपयात वीज कलेक्शन

‘रे नगर’मधील ३० हजार लाभार्थ्यांना फक्त ५०० रुपयांत नवीन वीज जोडणी देण्याबाबत २ नोव्हेंबरला असंघटित कामगारांच्या वतीने माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता. ‘महावितरण’ने कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामगारांसाठी बांधण्यात येत असलेल्या घरकुलांना वीज पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्यांकडून फक्त ५०० रुपयांत वीज कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com