esakal | पूरस्थितीमुळं कोकण रेल्वे विस्कळीत; ६,००० प्रवाशी अडकले!
sakal

बोलून बातमी शोधा

kokan train

पूरस्थितीमुळं कोकण रेल्वे विस्कळीत; ६,००० प्रवाशी अडकले!

sakal_logo
By
अमित उजागरे

कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं कोकण रेल्वेला मोठा फटका बसला असून रत्नागिरीत पूरस्थितीमुळे गुरुवारी रेल्वे सेवा बंद करण्यात आली. यामुळे या मार्गावरील सुमारे ६,००० प्रवाशी अडकून पडले आहेत. दरम्यान, या मार्गावरील ९ रेल्वे गाड्यांचं परिस्थितीनुसार नियमन करण्यात आलं आहे. यामध्ये गाड्या एकतर पुन्हा सोडण्यात आल्या आहेत, काही स्टेशन्सदरम्यान गाड्या सोडण्यात आल्यात किंवा काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही माहिती दिली. (6000 passengers stranded due to disrupt train services on Konkan route aau85)

हेही वाचा: राज्यातील पावसाचे अपडेट एका क्लिकवर; वाचा महत्त्वाचे 5 मुद्दे

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "या सर्व रेल्वे गाड्या सुरक्षित ठिकाणी विविध स्टेशन्सवर आहेत. तसेच या गाड्यांमधील सर्व प्रवाशी देखील सुरक्षित आहेत. या प्रवाशांना अन्न आणि पाणी पुरवण्यात येत आहे. चिपळूण आणि कामाठे दरम्यान वशिष्ठी नदीवरील रेल्वे पुलाखालील पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीनं या भागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याठिकाणी सुमारे ६००० रेल्वे प्रवाशी पूरस्थितीमुळं अडकून पडले आहेत."

'या' स्पेशल ट्रेन्स आहेत सुरक्षित

दादर-सावंतवाडी स्पेशल ट्रेन चिपळून स्टेशनमध्ये तर सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी स्पेशल ट्रेन खेड स्थानकात थांबवण्यात आली होती. या गाड्यांमधील प्रवाशी सुरक्षित आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे प्रवक्ते गिरीष करंदीकर यांनी दिली. या सर्व प्रवाशांना चहा, नाश्ता आणि पाणी याचा पुरवठा करण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोकण रेल्वे मार्ग ७६५ किमीचा

गेल्या काही दिवसांत कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत होण्याची ही दुसरी वेळ आहे. १९ जुलै रोजी पणजी जवळ जुन्या गोवा बोगद्यात पाणी साचल्याने रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात आला होता. कोकण रेल्वेचा ७५६ किमीचा मोठा मार्ग आहे, जी मुंबईजवळी रोहा ते कर्नाटकातील मंगळुरु येथील ठोकूर पर्यंत आहे. म्हणजे कोकण रेल्वेचा मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांतून जातो. या मार्गावर अनेक नद्या, खाडी आणि डोंगर लागतात. त्यामुळे हा रेल्वे प्रशासनासाठी सर्वाधिक आव्हानात्मक रेल्वे मार्ग आहे.

loading image