esakal | राज्यातील पावसाचे अपडेट एका क्लिकवर; वाचा महत्त्वाचे 5 मुद्दे
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

बुधवारपासून मुसळधार पाऊस सुरु असलेल्या राज्यातील काही भागात नद्या पात्राबाहेर पडल्यानं पुराचा धोकाही निर्माण झाला आहे.

राज्यातील पावसाचे अपडेट एका क्लिकवर; वाचा महत्त्वाचे 5 मुद्दे

sakal_logo
By
सूरज यादव

मुंबई - राज्यातील अनेक भागात बुधवारपुासून पावसाची संततधार सुरु आहे. अरबी समुद्रात असलेल्या आणि बंगालच्या खाडीत होऊ घातलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढील ४८ तासात राज्यात जोरदार पावसाची शक्यता बुधवारी हवामान खात्याने वर्तवली. बुधवारपासून मुसळधार पाऊस सुरु असलेल्या राज्यातील काही भागात नद्या पात्राबाहेर पडल्यानं पुराचा धोकाही निर्माण झाला आहे. रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय झालं आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला पूर आला आहे. कोकण, ठाणे, पालघरमधील पूरपरिस्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक घेतली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

मुंबई - कालपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने जोर (heavy rain) पकडला आहे. त्यामुळे कोकणासह (kokan) कल्याण, डोंबिवली, बदलापूर या भागात हाहाकार उडाला आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत-लोणावळा घाट भागात जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. कसारा घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. तर, काही ठिकाणी रेल्वे रूळ वाहून गेले आहे. पालघर जिल्ह्यातील (Palghar district) जव्हार, वाडा, विक्रमगड आणि मोखाडा या आदिवासी तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आहे. मुंबईतील पावसाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हेही वाचा: "हवं तर हेलिकॉप्टर वापरा, पण सगळ्यांना सुखरूप बाहेर काढा"

पंचगंगा इशारा पातळीवर

कोल्हापूर - पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर दुपारी तीन वाजता पाणीपातळी 39 फुटावर पोहोचली. नदीची धोका पातळी 43 फुटांवर आहे. कोल्हापूरात एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. कोल्हापुरातील पावसाचे अपडेट वाचण्यासाठी क्लिक करा

हेही वाचा: कोल्हापुरात उद्या ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सावधानतेचा इशारा

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार

सातारा - कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची संततधार कायमच असून पाणलोट क्षेत्रातील नवजा, महाबळेश्वर, वलवण या ठिकाणी उच्चांकी पावसाच्या सरीवर सरी बरसतच आहेत.

खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्याची शक्यता

पुण्यात पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं खडकवासला धरणाची पाणीपातळी 581.99 मीटरवर पोहोचली आहे. धरणातील पाणीसाठी 88.52 टक्के इतका झाला आहे. साडेचारच्या सुमारास 24.66 क्युसेकने विसर्ग सुरु असून तो वाढवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: वसई: तानसा नदीच्या पाण्याचा १० ते १२ गावांना विळखा

मराठवाड्यातही पावसाची संततधार

हिंगोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. मागील चोवीस तासात सकाळी आठ वाजेपर्यंत ४२.६० मिलिमीटर पाऊस झाला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

loading image