राष्ट्रवादीसोबत 70 टक्के जागांवर सहमत : अशोक चव्हाण

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, 70 टक्के जागांबाबत जवळपास सहमती झाल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, 70 टक्के जागांबाबत जवळपास सहमती झाल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

इंदापूरबाबत शरद पवारांशी सकारात्मक चर्चा; आता हर्षवर्धन पाटलांनी ठरवावे 

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत लढणार हे जवळपास नि्श्चित आहे. भाजप-शिवसेनाही अद्याप आघाडीत लढणार हे सांगत आहे. मात्र, अजूनही युती आणि आघाडीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. आज अशोक चव्हाण यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे काही नेतेही उपस्थित होते.

कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसची यांना उमेदवारी

अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे, की इंदापूर जागेसंदर्भात शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. आघाडीत होणाऱ्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. 70 टक्के जागांवर सहमती झाली असून, बाकी जागांवर लवकरच निर्णय होईल. परंतू, हर्षवर्धन पाटील ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे संपर्क होऊ शकत नाही. परंतु आता काय करायचं ते हर्षवर्धन पाटील यांनी ठरवायचे आहे. मी सकाळपासून हर्षवर्धन यांना फोन करतोय पण मोबाईल बंद येतोय. म्हणून मीडियाच्या माध्यमातून हर्षवर्धन यांना आवाहन करतोय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70% agree with NCP on seat sharing says Ashok Chavan