Kidney Transplant Success Story : ७२ वर्षीय आईने किडनी देत मुलीला दिले जीवदान; मातृत्वाचा अनोखा आदर्श, दहा वर्षांच्या डायलिसिसनंतर मुलीवर यशस्वी प्रत्यारोपण

Kidney Transplant Success Story : मुलीच्या जीवासाठी ७२ वर्षीय आईने स्वतःची किडनी दान केली. दहा वर्षे डायलिसिस घेणाऱ्या ५० वर्षीय मुलीवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. आईच्या मायेचा अनोखा आदर्श.
Kidney Transplant Success Story Mother Donates Kidney to Daughter

Kidney Transplant Success Story Mother Donates Kidney to Daughter

esakal

Updated on: 

Mother Donates Kidney to Daughter : मुलीच्या जीवासाठी वयाची ७२ वर्षेही अडथळा ठरू शकली नाहीत. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने दहा वर्षांपासून डायलिसिसवर असलेल्या ५० वर्षीय मुलीला तिच्या वृद्ध आईने स्वतःची डावी किडनी दान केली. मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात झालेली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, आई आणि मुलगी दोघींचीही प्रकृती स्थिर आहे. जयाबाई बापू तालवर (रा. गिरीम, ता. दौंड) यांनी किडनीदानातून मातृत्वाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे.

Loading content, please wait...