Maharashtra News : राज्यात 789 जातीचे पतंग; पश्‍चिम घाटात 91 ‘स्पेसीस’चा शोध

789 species of moths in state maharashtra news
789 species of moths in state maharashtra news esakal

Maharashtra News : सायखेडा (ता. निफाड) महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सचिन गुरुळे हे पतंग या कीटकावर २००७ पासून संशोधन करीत आहेत. त्यांनी जैवविविधतेने नटलेल्या पश्‍चिम घाटात राज्यासाठी ९१ ‘स्पेसीस’ शोधल्या आहेत.

जगभरात फुलपाखरांच्या १५ हजार जाती असून, पतंगाच्या एक लाख ८५ हजार जाती आहेत. देशात १२ हजार जाती असून, त्याचा अभ्यास ब्रिटिशांनी केला आहे. त्यातील ७८९ जाती राज्यातील आहेत.

इंग्लंडमधील संग्रहालयात हे कीटक पाहावयास मिळतात. अठराव्या शतकात हॅमसन यांनी पाच ‘व्हॉल्यूम’ लिहिले होते. इंग्रज भारत सोडून गेल्यावर या कीटकांचा अभ्यास पाहिजे, तसा झाला नसल्याचे डॉ. गुरुळे यांनी सांगितले. (789 species of moths in state maharashtra news)

ते म्हणाले, की देशात ‘बीएनएचएस’च्या सुभलक्ष्मी यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘मॉथ' (पतंगा)चा अभ्यास केला. २०१३ मध्ये मी डॉ. संतोष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मॉथ' कीटकावर पीएच.डी. मिळवली. त्यानंतर पश्‍चिम घाटात संशोधन सुरू केले.

पतंगाविषयी माहिती देताना ते म्हणाले, की पतंगांचा समावेश संधीपाद संघाच्या कीटक वर्गातील खवलेपंखी (लेपिडोप्टेरा) गणात होतो. त्यांना काही वेळा पाखरू अथवा पाकोळी असेही म्हटले जाते. पतंग आणि फुलपाखरे एकमेकांना जवळचे असून, ते एकाच गणातील आहेत. महाराष्ट्रात पतंगांची विविधता आणि संख्या फुलपाखरांच्या तुलनेत अधिक आहे.

बहुतेक पतंग निशाचर आहेत. मात्र, त्यांच्या काही जाती दिनचर, काही दिननिशाचर आहेत. वटवाघळाचे मुख्य खाद्य हे ‘मॉथ’ आहे. ‘हॉकमॉथ’ हा कीटक तासाला ५५ किलोमीटर वेगाने उडत असतो. हे कीटक चंद्रप्रकाशाचा उपयोग ‘नेव्हिगेशन’ म्हणून करतात. यामुळे बल्बसमोर हे ‘मॉथ' नेहमी दिसतात. त्यांना तो चंद्र वाटत असल्याने ते त्याच्या आजूबाजूला फिरताना दिसतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

789 species of moths in state maharashtra news
Krishna Janmashtami : गोपालकाला... सामाजिक ऐक्याची मांदियाळी! वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनाचा उत्सव

जंगलातील अभ्यास

संशोधन करताना जंगलात पांढरा पडदा लावून त्यावर मर्क्युरी वेवर दिवा लावून आम्ही अभ्यास करतो, असे सांगून डॉ. गुरुळे म्हणाले, की कीटकाची अळी विषारी असते. ९० टक्के ‘मॉथ’ जमिनीत कोश करतात. पतंगाचे आयुष्य हे सात ते पंधरा दिवसांचे असते. मादी नरापेक्षा अधिक दिवस जगते.

विशेष म्हणजे हे पतंग फुलपाखराची ‘मिमिक्री‘ करतात. कीटकअळी भाजीपाला फस्त करीत असल्याने अनेकदा शेतकरी मोठ्या प्रमाणात कीटकनाशक मारतात. त्याऐवजी शेतात हॅलोजन दिवा आणि पांढरे कापड लावून जमिनीवर रॉकेल टाकल्यास ही कीड नियंत्रणात येते. पतंग या कीटकावर ‘मॉथ ऑफ नॉर्थ महाराष्ट्रा’ हे पुस्तक मी लिहिले आहे.

अकरा संशोधन प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. पश्‍चिम घाटात काम करताना डॉ. अदिती शेरे, डॉ. ज्योती राजपूत, शाहरुख मणियार, गायत्री नारायणे, जयेश पाटील यांचे सहकार्य मिळते. आता पश्‍चिम घाटात नवीन आठ ते दहा जाती शोधल्या असून, त्यांच्यावर अभ्यास सुरू आहे.

वातावरणातील बदल

गेल्या दोन वर्षांपासून अनियमित पडत असणाऱ्या पावसामुळे कीटकांचे जीवनचक्र बदलत असल्याचे आढळले. त्यांचा प्रजनन काळ हा मार्च ते जून असताना तो आता पुढे दोन महिने सरकला असल्याचे अभ्यासात पुढे आले आहे, असेही डॉ. गुरुळे यांनी सांगितले.

789 species of moths in state maharashtra news
Nashik ZP Bharti : 1 हजार 38 जागांसाठी विक्रमी 64 हजार अर्ज दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com