Omicronला रोखण्यासाठी रुमाल नाही तर मास्कच हवा! नवा व्हेरिएंट घातक

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी रुमाल नाही तर मास्कच हवा! नवा व्हेरिएंट घातक
ओमिक्रॉनला रोखण्यासाठी रुमाल नाही तर मास्कच हवा! नवा व्हेरिएंट घातक
ओमिक्रॉनला रोखण्यासाठी रुमाल नाही तर मास्कच हवा! नवा व्हेरिएंट घातकesakal
Summary

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश दिले आहेत.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश दिले आहेत. यामध्ये मास्कचा (Mask) वापर बंधनकारक करण्यात आला असून, नव्या नियमानुसार रुमाल बांधणे मास्क समजले जाणार नाही आणि रुमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र असणार आहे. दरम्यान, नवा व्हेरिएंट हा घातक असून, रुमालाला तो जुमानणार नाही. त्यामुळे कापडी मास्क किंवा सर्जिकल मास्कचा वापर केला तर नव्या विषाणूचा (Virus) प्रसार रोखण्यास होण्यास मदत होणार असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी 'सकाळ'शी (Sakal) बोलताना दिली.

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी रुमाल नाही तर मास्कच हवा! नवा व्हेरिएंट घातक
सकाळ-साम महासर्व्हे : पंढरपुरात पुढचा आमदार राष्ट्रवादीचा!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असल्याने सर्वत्र नागरिकांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे मास्क आणि सुरक्षात्मक उपाययोजनांकडे नागरिकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. या सर्व गोष्टींकडे जिल्हा प्रशासनाने गंभीरपणे घेतले नाही. मात्र, आता कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूने जगभर भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रशासनासोबत संवाद साधून उपाययोजनांबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा मास्कचा वापर सर्वांना बंधनकारक असणार आहे.

खबरदारी घेणे गरजेचेच

ओमिक्रॉन विषाणूचा रुग्ण नसला तरी सुरक्षा म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांशी आरोग्य यंत्रणा धाडसाने सामोरे गेली आहे. त्यामुळे नव्या विषाणूबाबत मनात कोणतीही भीती न ठेवता नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आरोग्य विभाग, महापालिका, जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी रुमाल नाही तर मास्कच हवा! नवा व्हेरिएंट घातक
Omicron वर होत नाही लसींचा कोणताही परिणाम! लस निर्मात्यांची कबुली

ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वेग पूर्वीच्या विषाणूपेक्षा जलद आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी रुमाल न वापरता कापडी किंवा सर्जिकल मास्कचा वापर करावा; जेणेकरून होणारा पुढील धोका टाळता येईल.

- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com