परप्रांतात अडलेल्या तरुणांची आदित्य ठाकरेंनी अशी केली मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray
जवळपास 200 पेक्षा जास्त तरुण तेथे अडकून पडले आहेत. #AadityaThackeray #HimantaBiswaSarma #Maharashtrian #Assam

परप्रांतात अडलेल्या तरुणांची आदित्य ठाकरेंनी अशी केली मदत

आसाममध्ये अडकलेल्या तरुणांसाठी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा (Himanta Biswa Sarma) यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आहे. आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणं झाल्यानंतर आसाम राज्य सरकारने महाराष्ट्रातील तरुणांपर्यंत तात्काळ मदत पोहचवली. 'आसाम रायफल्स'च्या भरतीसाठी महाराष्ट्रातून आसाममध्ये गेलेल्या तरुणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या मुलांना दिपू वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ठेवण्यात आले होते. सुरुवातीचे तीन दिवस त्याना अन्न पाणीही मिळाले नव्हते.

जवळपास 200 पेक्षा जास्त तरुण तेथे अडकून पडले आहेत. आम्हाला चांगले जेवण, गरम पाणी आणि परीक्षेला बसू देण्याची व्यवस्था करावी' अशी माफक अपेक्षा उपाशीपोटी राहिलेल्या उमेदवारांकडून करण्यात आली होती. आसाममध्ये महाराष्ट्रातील तरुण अडचणी असल्याची बातमी सकाळने दिली होती. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सकाळच्या वृत्ताची दखल घेत थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. राज्यातील मुलांना आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन त्यांनी आसामच्या मुख्यंत्र्यांकडे केले आणि अडचणीत असलेल्या तरुणांपर्यंत आवश्यक ती मदत पोहचवली.

हेही वाचा: आचारसंहिता लागू झाल्यानंतर असे असतात निर्बंध

आसाम राज्यामधील 'आसाम रायफल' या निमलष्करी दलातील हवालदार पदासाठीची भरती प्रक्रिया 7 व 8 जानेवारी दरम्यान होणार आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध जिल्ह्यांमधून तरुण आसामध्ये भरतीसाठी गेले होते. महाराष्ट्रातून 200 ते 250 हून अधिक उमेदवार 3 जानेवारीलाच अँगलॉंग या जिल्ह्यातील दिपू या शहरामध्ये दाखल झाले होते. तेथेच त्यांची भरती प्रक्रिया होणार होती. दरम्यान, भरतीपुर्वीच उमेदवारांची कोरोनाची रॅपीड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 ते 70 जण कोरोना संसर्गाने बाधित झाले. त्यांच्यासह 200 हून अधिक तरुणांना दिपू वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top