Abdul Sattar : "सत्तार यांच्यासारखा माणूस मंत्री हे महाराष्ट्राचं दुर्दैव"

Agriculture Minister Abdul Sattar
Agriculture Minister Abdul Sattar Sakal
Updated on

मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार चर्चेत आहेत. आपल्या कृतीमुळे सत्तार सातत्याने वादात सापडत आहेत. त्यातच सत्तार यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हणत शिवसेनेसह काँग्रेसला डिवचल आहे. या टीकेवर काँग्रेसकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

Agriculture Minister Abdul Sattar
उध्दव ठाकरे घेणार महाराष्ट्राचा आढावा!

जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सत्तार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. गोरंट्याल म्हणाले की, सत्तारांसारखा माणूस मंत्री असणं महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे. सत्तार तुम्हाला अडचणीत आणतील, हे आपण आधीच शिंदे-फडणवीसांना सांगितल्याचंही गोरंट्याल यांनी म्हटलं.

कृषीमंत्री सत्तार यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करताना म्हटलं होतं की, छोट्या पप्पूला अजून कळतच नाही की कुणाला काय विचारावं. त्यांची अनेक जुनी प्रकरणं काढली तर त्यांना फिरता येणार नाही. याआधी सत्तार यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का असा प्रश्न विचारला होता. या संदर्भातील व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

Agriculture Minister Abdul Sattar
Narayan Rane: चारआण्यावरील नारायण राणेंचा फोटो व्हायरल; सोशल मीडियावर राडा

सत्तार सातत्याने वादग्रस्त ठरत असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सचिवांना देखील शिवीगाळ केल्याचं समोर आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com