
अभिजीत बिचुकले राष्ट्रपती पदासाठी इच्छुक; सह्यांसाठी आमदार-खासदारांच्या संपर्कात
देशात सध्या राष्ट्रपती निवडणुकीची धामधूम सुरू आहे. शरद पवारांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं या पदासाठी पुढे येत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातलं आणखी एक प्रसिद्ध नाव या पदासाठी समोर येतंय. बिग बॉस मराठी मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेलं हे नाव म्हणजे अभिजीत बिचुकले. आपण राष्ट्रपती पदासाठी इच्छुक आहोत आणि काही आमदार-खासदारांशी संपर्कात आहोत, असं सांगत बिचुकलेंनी याबद्दल पुष्टी केली आहे.(Abhijeet Bichukale to contest president election)
हेही वाचा: Video : राष्ट्रपती निवडणूक कशी लढवली जाते ?
आपण राष्ट्रपती निवडणुकीसाठी उभं राहणार असल्याचं सांगताना अभिजीत बिचुकले म्हणाले,"हे सत्य आहे. मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या काही आमदार- खासदारांशी सह्यांसंदर्भात संपर्कात आहे. मी बहुजन समाजातला आहे, निर्व्यसनी, सुशिक्षित आणि कायद्याची माहिती असणारा आहे, हे मी मागच्या वेळीच मोदींना सांगितलं होतं. मात्र त्यांनी कोणीतरी कोविंदसाहेब शोघून आणले आणि त्यांनी राष्ट्रपती केलं. बहुमत असल्यामुळं त्यांना ते जमलं"
हेही वाचा: पुढचे राष्ट्रपती कोण?, भाजपने ममतांसह काँग्रेस, सपाशी साधला संपर्क
आपण सह्यांसाठी काही आमदार खासदारांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं. बिचुकले (Abhijeet Bichukale) म्हणाले की, न्यायपालिका, केंद्रातले निर्णय यांची सगळी ताकद राष्ट्रपतीच्या दबावाखाली असते. राष्ट्रपतींनी देशासाठी बरंच काही करायचं असतं. पण ते करत नाहीत. म्हणूनच आता मी देशातल्या आमदार खासदारांशी बोलतोय. सांगली, कोल्हापूर, पुण्यातल्या खासदारांशी चर्चा सुरू आहे. अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली तर माझा अर्ज १०० टक्के जाणार.
Web Title: Abhijeet Bichukale To Contest Presidential Election 2022 Big Boss Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..