बिचकुले न्यायालयात सादर

बिचकुले न्यायालयात सादर

सातारा : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये चर्चेत असलेला साताऱ्यातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) मुंबई येथे बिग बॉसच्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. 

येथील न्यायालयात एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले याच्यावर खटला सुरू आहे. 2015 मध्ये हा खटला दाखल झाला होता. सध्या सहावे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आवटी यांच्या समोर हा खटला सुरु आहे. त्यात तो हजर राहत नसल्याने न्यायाधीश आवटी यांनी याप्रकरणी अटक वॉरंट काढले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तिघांचे पथक काल रात्री मुंबईला रवाना झाले होते. आज दुपारी त्यांनी बिचुकलेला बिग बॉसच्या घरातून ताब्यात घेतले.

दरम्यान, बिचकुले याला उद्या सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, आजच त्याला न्यायालयात हजर केले गेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com