

Abhijit Deepke Responds to Funding and Political Allegations
Esakal
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर अकाउंट तयार केल्यापासून ते दिल्लीत आंदोलनाला मिळालेल्या यशानंतरही सीजेपीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. अभिजीत दीपकेला परदेशातून फंडिंग मिळतंय, तो भाजपची बी टीम आहे, आपची स्लीपर सेल असल्याचाही आरोप केला गेला. या आरोपांना आता अभिजीत दीपकेनं उत्तर दिलंय. जर मला परदेशातून फंडिंग येत असेल तर हे गृहविभागाचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं अपयश आहे असं अभिजीत दीपके यानं म्हटलंय.