Abu Azmi : नामांतराच्या निर्णयावर अबू आझमी नाराज, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abu Azmi angry over decision to rename Aurangabad and Osmanabad

नामांतराच्या निर्णयावर अबू आझमी नाराज, म्हणाले...

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने बुधवारी (ता. २९) बैठक घेत अनेक निर्णय घेतले. यामध्ये औरंगाबादचे नामांतर हा हा सर्वांत महत्त्वाचा निर्णय होता. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलल्याने समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी (Abu Azmi) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लिमांना बाजूला करायचे आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. (Abu Azmi angry over decision to rename Aurangabad and Osmanabad)

आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली आहे. अशात राज्य सरकारने विविध निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. सलग तीन दिवसांपासून निर्णयाचा सपाटा सुरू आहे. काल पोलिस भरतीची घोषणा करण्यात आली होती. तसेच बुधवारी होणाऱ्या बैठकीत औरंगाबादचे नामांतराचा मुद्दा मांडणार असल्याचे सांगण्यात आले होते.

हेही वाचा: शिंदे म्हणाले, "चित्र स्पष्ट आहे, कोणालाही काही सांगण्याची गरज नाही"

त्यानुसार आजच्या बैठकीत औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर करण्यास मंजुरी देण्यात आली. आता औरंगाबाद हे संभाजीनगर म्हणून ओळखले जाणार आहे. तसेच उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याला काहींचा विरोधही सुरू झाला आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी (Abu Azmi) यांचा समावेश आहे.

अबू आझमी यांनी याविषयी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे (Osmanabad) नाव धाराशिव करण्याचा निर्णय आज उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे. भाजप असो किंवा महाविकास आघाडी सरकार हे कुबड्यांवर चालत आहेत. यांना मुस्लिमांना बाजूला करायचे आहे, असे ट्विट अबू असीम आझमी यांनी केले आहे. या ट्विटवरून त्यांची नाराजी स्पष्ट दिसून येत आहे.

Web Title: Abu Azmi Angry Over Decision To Rename Aurangabad And Osmanabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top