
Urfi Javed Astrology : यंदाची संक्रात उर्फीसाठी क्लेशदायक, कोर्ट-कचेरीचा त्रास वाढणार, ज्योतिषी म्हणतात...
Urfi Javed Astrology : सध्या उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील चांगलाच चर्चेचा विषय आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ या उर्फीवर निशाणा साधत आहे. उर्फी परिधान करत असलेल्या कपड्यांवरुन तिच्या विरोधात चित्रा वाघने भूमिका घेतली. अशातच उर्फीची यंदाची संक्रात कशी असणार, याविषयी ज्योतिषी यांनी सांगितले.
ज्योतिषी म्हणतात की उर्फीची रास ही वृषभ आहे. या राशीचा विचार केला तर हा काळ या राशींसाठी उत्तम नसणार. यंदाची संक्रात यांच्यावर आहे.
हा काळ या राशीसाठी वाईट आणि नुकसानीचा काळ आहे ज्याचा परिणाम उर्फीला भोगावा लागेल. उर्फीची कोर्ट-कचेरीचा त्रास वाढणार. एवढचं काय तर तिची जनमानस प्रतिमेवरही नकारात्मक प्रभाव पडणार.
- डॉ. नरेंद्र धारणे, ज्योतिष वाचस्पती
हेही वाचा: Devendra Fadnavis Astrology : फडणवीसांची केंद्रात वर्णी लागणार? ज्योतिषी म्हणतात, नवीन वर्षी मोठी जबाबदारी येणार...
चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिस दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी याची दखल घेत उर्फीला नोटीस बजावली होती. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्या प्रकरणी ही नोटीस पाठवली होती. यावर उर्फीने मुंबईच्या आंबोली पोलिसांमध्ये जबाब नोंदवत या स्पष्टीकरण दिले आहे.