
शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी निकटवर्तीयाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हिडिओ व्हायरल प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील 'मातोश्री' नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून या प्रकरणात ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान या व्हिडिओ व्हायरल प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
पोलिस यासंबधी तपास करत आहेत. साईनाथ दुर्गे यांना विमानतावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी ही प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभर तपास सुरू केला आहे. साईनाथ दुर्गे यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, शिंदे गटातील आमदारांचे विषय दाबण्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत, पोलिसांनी अटक केलेल्या साईनाथवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, साईनाथ हा वाघ आहे, तो लढत राहणार.
हे सगळे अन्यायाचे विषय आमच्यावर होत राहणार धरपकड होत राहणार मात्र आम्ही लढत राहणार. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईवर चालत येत आहे, अब्दुल सत्तार यांनी शेतकरी आत्महत्यावर केलेले विधान दबलेले आहे. असे काही विषय काढून महत्त्वाचे विषय दाबले जात आहेत. अशी प्रतिक्रिया अदित्य ठाकरे यांनी दिली आहे.