आदित्य म्हणाले, चंद्रपूर शहरात प्रदूषणाची समस्या प्रकर्षाने जाणवली

aditya thakrey
aditya thakrey aditya thakrey
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात येत असताना प्रदूषणाची (pollution) समस्या प्रकर्षाने जाणवली. चिमण्यांतील धूळ, उद्योगांतील प्रदूषण दिसून आले. काही दिवसांपूर्वी आम्ही नांदगाव येथील फ्लाश ॲशवरील डंपिग यार्डचे काम थांबविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण थांबविण्यासाठी पुढील काळात ठोस पावले उचलली जातील, अशी ग्वाही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली.

शहरातील गोंडकालीन रामाळा तलावाचे खोलीकरण, सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी रविवारी (ता. १३) पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, विभागीय आयुक्त लवंगरे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आदींची उपस्थिती होती. रामाळा तलावात पसरलेली जलपर्णी वनस्पती, सांडपाण्यामुळे प्रदूषण (pollution) वाढले होते. इको-प्रो पर्यावरण संस्थेने ही परिस्थिती पर्यावरणमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने रामाळा तलावाचे खोलीकरण, सौंदर्यीकरण कामासाठी निधी मंजूर केला. रविवारी याच कामाची त्यांनी पाहणी केली.

aditya thakrey
उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन : पटोले

काही महिन्यांपासून कॅबिनेटच्या बैठकीत रामाळा तलावाबाबत चर्चा झाली. रामाळा तलाव पुर्नजिवित, परिसराचे सुशोभीकरण, टुरिझमाच्या दृष्टीने आता काम केले जाणार आहे. सोबतच १२ किलोमीटर लांबीच्या किल्ला परकोटावर हेरिटेज वॅाकला चालना देण्यासाठी इको-प्रो संस्थेने दिलेल्या सूचनांवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रशासनाला दिले. इरई नदीचीही त्यांनी पाहणी केली.

ढेपाळलेली सुरक्षा व्यवस्था

आदित्य ठाकरे यांना चंद्रपुरात ढेपाळलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा सामना करावा लागला. स्थानिक ऐतिहासिक रामाळा तलावाच्या खोलीकरण कामाच्या पाहणीसाठी आदित्य ठाकरे घटनास्थळी पोहोचले. तेव्हा तिथे अनावश्यक लोकांची एकच झुंबड उडाली. कार्यक्रम हा सार्वजनिक नव्हता किंवा तिथे त्यांचे भाषणही नव्हते. त्यामुळे अवांतर गर्दी तिथे टाळता आली असती. परंतु, पोलिस यंत्रणेने तशी कोणतीही व्यवस्था न केल्याने स्थानिक नागरिकांची तोबा गर्दी उसळली.

aditya thakrey
भीषण अपघातात अख्ख कुटुंब ठार; कारचा टायर फुटल्याने घडला अनर्थ

अनावश्यक गर्दीने गराडा

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे कॅबिनेट मंत्री असण्यासोबतच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत. त्यांना दिली जाणारी सुरक्षा चोख असायला हवी होती. मात्र, त्यांना अनावश्यक गर्दीने गराडा घातला. सोबतच अनेकजण केवळ सेल्फीसाठी त्यांच्या जवळ जात होते. लगट करीत होते. हे चित्र आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com