उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन : पटोले

Devendra Fadnavis on Nana patole
Devendra Fadnavis on Nana patoleDevendra Fadnavis on Nana patole

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना पसरण्यास महाराष्ट्रातील काँग्रेस जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुंबईतील सागर बंगल्याबाहेर काँग्रेस सोमवारी (ता. १४) आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

देशात कोरोना पसरण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचे वक्तव्य लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी केले होते. यामुळे काँग्रेसचे खासदार, आमदार व कार्यकर्ते चांगलेच आक्रामक झाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याने नाराज झालेल्या काँग्रेसने भाजपच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांचे आंदोलनही सुरू आहेत.

Devendra Fadnavis on Nana patole
मेहबूबा म्हणाल्या, भारतीय मुस्लिमांसाठी भारतीय असणे पुरेसे नाही, तर...

दोन ते तीन दिवासंपासून भाजप (BJP) नेत्यांच्या घरासमोर काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करीत आहे. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून सोमवारी (ता. १४) काँग्रेस देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुंबईतील सागर बंगल्याबाहेर आंदोलन करणार आहे.

जशास तसे उत्तर देऊ

काँग्रेसने सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन केल्यास जशात तसे उत्तर देऊ, असा इशारा प्रसाद लाड आणि मंगलप्रभात लोढा यांनी दिला. नाना पटोले (Nana Patole) उद्या सकाळी १० वाजता सागर बंगल्याबाहेर येऊन तर दाखवा, पाहतो परत कसा जातो, असेही ते म्हणाले.

हे केले होते विधान

कोरोनाच्या काळात महाराष्ट्र काॅंग्रेसने मर्यादेचा कळस गाठला होता. राजकारण केले. काॅंग्रेसने महाराष्ट्रातून मजुरांना स्थलांतर करण्यास भाग पाडले. महाराष्ट्रातून कामगारांना रेल्वेचे तिकीट काढून पाठवून दिले. काॅंग्रेस अफवा परवून अडचणी आणखी वाढविल्या. त्यामुळे कोरोना परसविण्यास काॅंग्रेस जबाबदार आहे, असा थेट हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेसवर केला होता. त्यामुळे मोदी यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com