११वी अॅडमिशनबाबत विद्यार्थी आणि पालकांना दिलासा; फॉर्म भरण्यासाठी लागणार फक्त मार्कशीट!

Students Admission
Students Admission

पुणे : इयत्ता ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना केवळ गुणपत्रिका सादर करता येणार आहे. कोरोनामुळे इतर कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची अडकवून होणार नसल्याचे इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी स्पष्ट केले आहे. 

इयत्ता १०वीचा निकाल लागल्यानंतर आता ११वी प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची गडबड सुरू झाली आहे, पण कागदपत्रांऐवजी प्रवेशापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी सूट देण्यात आली आहे. 

११वीचा प्रवेश अर्ज केवळ गुणपत्रिकेद्वारे भरता येईल, पण ज्या विद्यार्थ्यांकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असतील, तर ते अपलोड करु शकतील. 
क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, बदली आदेश, आदी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांनी अर्ज भरतेवेळी अपलोड करणे आवश्यक आहे.

इ.११वी प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी तांत्रिक कारणांमुळे सादर न केल्यास त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. ही प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे.

अधिकृत माहितीसाठी संकेतस्थळ
इयत्ता ११वी प्रवेशाची अधिकृत माहिती 
www.dydepune.com आणि https://pune.11thadmission.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या ई-मेल आयडीवर ही लिंक पाठविण्यात आलेली आहे.

११वी प्रवेशाची क्षमता
महाविद्यालय - ३०४
कला शाखा - १५५८१
वाणिज्य - ४२,७५५
विज्ञान - ४३,९८१
एमसीव्हीसी - ४४९५

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com