१०० रुपयांत मिळणार अकरावीत प्रवेश! अर्ज करण्यासाठी १९ ते २८ मेपर्यंत मुदत; विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘हा’ हेल्पलाईन क्रमांक; जाणून घ्या, संपूर्ण माहिती...

राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विद्यार्थी, पालकांचा वेळ, श्रम व पैसा यामध्ये बचत होणार आहे. ही प्रक्रिया गुणवत्तेनुसार व पारदर्शक असणार आहे. १९ मेपासून २८ मेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
Eleven Standard Class Admission News
Eleven Standard Class Admission Newssakal
Updated on

सोलापूर : राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात केंद्रीकृत प्रवेश प्रणाली लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे विद्यार्थी, पालकांचा वेळ, श्रम व पैसा यामध्ये बचत होणार आहे. ही प्रक्रिया गुणवत्तेनुसार व पारदर्शक असणार आहे. १९ मेपासून २८ मेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. प्रवेश अर्जासाठी विद्यार्थ्यांना अवघे १०० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.

दरवर्षी ऑफलाइन प्रवेश अर्ज करताना कनिष्ठ महाविद्यालयांकडून पाच ते १५ हजार रुपयांपर्यंत शुल्क घेतले जात होते. मेरिट यादीवर कोणाचेच नियंत्रण नव्हते. विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये अर्जाचे शुल्क भरून प्रवेश अर्ज करावा लागत होता. पण, आता प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी, विद्यार्थ्यांना एकाचवेळी अनेक महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे शुल्क न भरता प्रवेशासाठी अर्ज करता यावेत म्हणून शिक्षण विभागाने यंदापासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्यांदाच अशी प्रणाली विकसित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर प्रवेश घेईपर्यंत मार्गदर्शन मिळावे म्हणून विभागीय स्तरावर स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहे. याशिवाय हेल्पलाइन क्रमांक देखील देण्यात आला आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे...

  • सुलभता : विद्यार्थी राज्यात कोठेही आणि मुदतीत केव्हाही अर्ज करू शकतात. त्यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.

  • पारदर्शकता : प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असल्यामुळे कोणताही पक्षपात किंवा गैरव्यवहार होणार नाही.

  • वेळ, श्रम व खर्च बचत : कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची आता गरज नाही. प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.

  • प्रणालीद्वारे मार्गदर्शन : वेबसाइटमध्ये आवश्यक माहिती, सूचना आणि सुधारणा वेळोवेळी कळविल्या जाणार आहेत.

  • स्वतःचे प्राधान्यक्रम निवड : विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार किमान १० कॉलेज निवडू शकतात आणि त्यात बदलही करू शकतात.

  • दस्तऐवज अपलोड सुलभ : मूळ कागदपत्रांची फोटोकॉपी घेऊन जाण्याची गरज नाही. कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करता येतात.

  • एकाच पोर्टलवर सर्व माहिती : एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सोय आणि सर्व कॉलेज माहिती मिळेल. प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक व फेऱ्यांचे निकाल ऑनलाइन समजणार आहे.

  • आपोआप गुणवत्ता यादी : गुणांनुसार प्रवेश निश्चित केला जाईल. त्यामुळे निकोप स्पर्धा आणि विद्यार्थ्यांना न्याय्य संधी मिळणार आहे.

विभागीय उपसंचालक स्तरावर तांत्रिक साहाय्य व मार्गदर्शन

  • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मदत

  • अर्जात सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन

  • दाखल करण्यात येणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती

  • OTP किंवा पासवर्ड विसरल्यानंतरच्या अडचणी सोडवणे

महत्त्वाचे मुद्दे :

  • विद्यार्थी नोंदणी कालावधी : १९ ते २८ मे २०२५

  • अधिकृत संकेतस्थळ : https://mahafyjcadmissions.in

  • नोंदणी फी : १०० रुपये (संपूर्ण राज्यासाठी समान)

  • प्रवेश फेऱ्या : शून्य फेरी, चार सामान्य फेऱ्या, व विशेष फेरी

  • संपर्क : हेल्पलाइन : ८५३०९५५५६४ किंवा ईमेल – support@mahafyjcadmissions.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com