Supriya Sule on Damania: "त्यांना 48 तासांत..."; दमानियांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंची भुजबळांवर कुरघोडी

भुजबळांवर मुंबईतील एका कुटुंबाचं घर लाटल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
Updated on

मुंबई : छगन भुजबळ यांनी मुंबईतील एका कुटुंबाचं घर लाटल्याचा गंभीर आरोप नाशिक इथल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या पीडित कुटुंबासह त्यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला.

पण आता दमानियांच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी भुजबळांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असून ४८ तासांत पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. (After Anjali Damania allegations on Chhagan Bhujbal Supriya Sule reacted)

Chhagan Bhujbal
Aditya Thackeray: "...तर माझ्या आजोबांना आनंद झाला असता"; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

तीन मुलं आणि एक विधवा आई यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळं आपण सर्वांनी राजकारण बाजुला ठेवून अतिशय संवेदनशीलपणे त्याच्याकडं बघावं. अंजली दमानिया यांनी देखील अत्यंत संवेदनशीलपणे हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. (Marathi Tajya Batmya)

फुल ना फुलाची पाकळी मी देखील पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळं पुढच्या ४८ तासांत त्या तिन्ही लेकरांना आणि त्यांच्या आईला न्याय मिळेल अशी आपण सर्वजण अपेक्षा करुयात. त्याच्यात कुठलंही राजकारण आणायला नको, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळातून काढून टाका म्हणणाऱ्या संभाजीराजेंना भुजबळांचं प्रत्युत्तर; म्हणाले, तुम्ही एका समाजाचे...

दमानियांचा आरोप काय?

मी छगन भुजबळांचं एक प्रक्षोभक असं भाषण ऐकलं आणि त्यामुळं माझ्या डोक्यात तिडीक गेली. तळपायाची आग माझ्या मस्तकात गेली. काल ते म्हणाले, आम्ही आमच्या कष्टाचं खातोय. तर ते कुठल्या कष्टाचं खाताहेत त्याचा खुलासा करण्यासाठी आज मी त्यांचं घर मीडियाला दाखवलं.

हे त्यांचं घर नाही तर त्यांनी फर्नांडीस परिवाराचं हे लुटलेलं घर आहे. या कुटुंबाचा एक छोटा बंगला होता, तो बंगला त्यांनी रहेजा बिल्डरला पुनर्विकासासाठी दिला आणि त्यात त्यांना पाच फ्लॅट मिळणार होते, ते पाच फ्लॅट त्यांना कधीही मिळाले नाहीत.

Chhagan Bhujbal
Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

दमानियांच्या आरोपांवर भुजबळांची प्रतिक्रिया

अंजली दमानिया यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, "सुपारी घेणाऱ्यांबद्दल मी काहीही बोलणार नाही. नेमकाचं ओबीसींचा लढा सुरु असताना असे आरोप केले जात आहेत"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.