राज्यात पुन्हा मास्कसक्ती? मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

राज्यात काल जवळपास दीड हजारांच्या जवळ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती.
mask
maskesakal

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांनी प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढवली आहे. राज्यात काल जवळपास दीड हजारांच्या जवळ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती. तर एकट्या मुंबईमध्ये हजारांच्या जवळ कोरोना बिधित आढळून आले होते. दरम्यान, वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet Meeting ) थोड्याच वेळात बैठक पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये कोरोनाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणार असून, बैठकीमध्ये मास्क सक्तीबाबत (Face Mask) निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Corona Update News)

mask
कोरोना : महाराष्ट्रात पुन्हा भीतीदायक आकडेवारी; सर्वाधिक रुग्ण मुंबईत

...तर मास्क सक्ती अन् निर्बंधांबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल : वडेट्टीवार

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे प्रशासन सतर्क झाले असून, राज्यात अशाच पद्धतीने रूग्णसंख्या वाढत राहिल्यास मास्क सक्ती आणि कठोर निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे विधान राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात मुंबईमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, त्या पाठोपाठ ठाण्याचा नंबर आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. रविवारी राज्यात 1, 494 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

mask
Video : नागपुरातील कोरोना वाढीमागे दिल्लीचा हात : नितीन राऊत

शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही - वर्षा गायकवाड

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम व्यक्त करण्यात येत होता. मात्र, यावर आता शालेय शिक्षण विभागानं स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यातील शाळा १५ जूनलाच सुरु होतील. तसेच विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक असणार नाहीत, असं आरोग्य मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. (Schools in Maharashtra will start on June 15 Masks not Mandatory for Students)

गायकवाड म्हणाल्या, आम्ही कोविडच्या स्थितीचा आढावा घेत आहोत. पण कोविडच्या योग्य नियमावलींसह आम्ही १५ जून रोजी शाळा सुरु करणार आहेत. शाळेत येताना विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक असणार नाही. यापार्श्वभूमीवर नव्या एसओपीज जाहीर करण्यात येतील. तसेच पुढील निर्णय हे परिस्थिती पाहुन घेतले जातील, असंही शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com