घर तुटलंय, राऊतांनी मध्यस्थी घडवून आणावी; टीकेनंतर दीपाली सय्यद यांचा पलटवार

'संजय राऊत मोठे आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे.'
Deepali Sayed vs Sanjay Raut
Deepali Sayed vs Sanjay Rautesakal
Summary

'संजय राऊत मोठे आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे.'

Deepali Sayed Latest News : राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केलीय. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन, असं विधान देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केलं होतं. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी मोठं विधान केलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार, असं म्हटलंय. या विधानानंतर खासदार संजय राऊत यांनी सय्यद यांना चांगलंच खडसावलंय. दीपाली सय्यद यांनी काळजीपूर्वक विधानं करावीत, अशा शब्दांत राऊतांनी त्यांना सुनावलंय.

Deepali Sayed vs Sanjay Raut
पाकिस्तान : कराचीत IndiGo विमानाचं Emergency Landing

राऊतांच्या टीकेनंतर माध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या, मला जे वाटतं, ते मी मांडते. प्रत्येकाच्या मनात इगो मान-अपमान आहे. पण, दुरावा दूर व्हावा, अशी माझी इच्छा आहे. तुटलेलं घर एकत्र यावं हे कार्यकर्ते म्हणून मला वाटतं. संजय राऊत (Sanjay Raut) हे मोठे आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा आणि मध्यस्थी घडवून आणावी. कारण, मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, असं स्पष्ट मत सय्यद यांनी व्यक्त केलंय.

शिवसेनेतील आमदारांच्या भूमिकेनंतर दोन गट पडले आहेत. मात्र, एकाच कुटुंबाचे असे गट ही न बघवणारी स्थिती आहे. एकाच आधारवडाखाली शिवसेनेचे कार्यकर्ते असणं महत्वाचं आहे. त्यामुळं आता अधिकचा वेळ न जाता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं, असं माझं मत आहे. ही माझी एकटीचीच इच्छा नाहीतर, असंख्य शिवसैनिकांच्या मनातले आपण बोलून दाखवले असल्याचंही त्या म्हणाल्या. शिवसेनेतील दोन गटामुळं शेवटी नुकसानच होणार आहे. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी या दोन्ही गटांनी एकत्र यावं आणि त्यासाठीच आपण मध्यस्तीची भूमिका घेत आहे. अगदी सुरवातीपासून यावर माझं लक्ष राहिलं आहे, असंही त्या म्हणाल्या.

Deepali Sayed vs Sanjay Raut
PM मोदींच्या कार्यक्रमात रचला होता कट, PFI च्या सदस्याला लखनौमधून अटक

दीपाली सय्यद यांनी काळजीपूर्वक विधानं करावीत : संजय राऊत

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "मला माहित नाही, त्या अभिनेत्री आहेत, आमच्या पक्षात काम करतात, त्यांना हे अधिकार कोणी दिले. त्या काय शिवसेनेच्या नेत्या नाहीत. पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील. पण अशा प्रकारची विधानं खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. या प्रकारची विधानं पक्षाचे कार्यकर्ते, नेते करू शकतात."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com