Abdul Sattar : "पवारांची पावर अशीच राहो"; बारामतीत पोहोचताच सत्तारांकडून कौतुकाचा वर्षाव

काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
Abdul Sattar Sharad Pawar
Abdul Sattar Sharad PawarSakal

कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज बारामतीत एका कार्यक्रमाला पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचीही आता चर्चा होऊ लागली आहे.

बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या कृषिप्रदर्शनामध्ये सत्तार बोलत होते. आपण या कार्यक्रमाला राजकीय पुढारी म्हणून नाही, तर कृषीमंत्री म्हणून आलो आहे, असं अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले. त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांच्या कामाचं कौतुक केलं आहे. तसंच पवारांची पावर अशीच राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना, असंही ते म्हणाले आहेत.

Abdul Sattar Sharad Pawar
Narendra Modi Mumbai Visit : मोदींना हसू आवरेना; मुख्यमंत्री शिंदेंचा 'दावोस'मधला 'तो' किस्सा काय?

सत्तार म्हणाले, "बारामतीमध्ये खूप चांगलं कृषीप्रदर्शन भरवलं आहे. २०२३ मधलं हे सगळ्यात चांगलं प्रदर्शन आहे. या ठिकाणी असलेली शेती बघितल्यावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राजेंद्र पवार यांचं शेतीतलं योगदान पाहायला मिळत आहे. जुनी शेती नवी करण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे."

सुप्रिया सुळेंबद्दल काय बोलले होते?

काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरला होता. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. महिला आयोगापर्यंत हा विषय गेला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com