
‘महाराष्ट्रात सध्या अनेक पोपट हे पोपटपंछी करतेय’
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघातील कृषी प्रकल्प (Agricultural project) मालेगावला हलविण्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मालेगावला कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनच नवीन प्रकल्प घेण्यात येत आहे, असे कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी रविवारी (ता. २०) सांगितले.
शिवसेनेचा पश्चिम विदर्भ कार्यकर्ता मेळावा तसेच कृषी विभागाच्या विभागीय बैठकीच्या निमित्ताने कृषिमंत्री दादाजी भुसे रविवारी अमरावतीत आले होते. माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे १० कोटींचा मंजूर जैविक खत निर्मिती कारखाना मालेगवाला स्थलांतरित करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत विचारले असता कृषिमंत्र्यांनी या आरोपाचे खंडण केले.
हेही वाचा: उभा ट्रेलर पाहून चालक घाबरला अन् तागडे कुटुंबाला मृत्यूने कवटाळले
या प्रकल्पाबाबतची कागदपत्रे आपण डॉ. बोंडे यांना देण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्या पुनर्वसनासंदर्भात त्यांनी सूचक वक्तव्य केले. वेळ, काळ हाच अनेकदा समस्यांवर रामबाण उपाय असतो. संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील वापसीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असेही दादाजी भुसे (Dadaji Bhuse) म्हणाले.
राणेंबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मातोश्री बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोपावर कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी उत्तर देण्यास नकार दिला. नारायण राणे हेसुद्धा शिवसेनेचेच ‘प्रॉडक्ट’ आहेत, हे ते विसरले असून आपण राणेंना फारसे महत्त्व देत नाही, असे ते म्हणाले. त्याशिवाय महाराष्ट्रात सध्या अनेक पोपट हे पोपटपंछी करीत असल्याचा टोलाही दादाजी भुसे यांनी लगावला.
Web Title: Agriculture Minister Dadaji Bhuse Agricultural Project Narayan Rane Amravati District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..