Crime News : लग्न जमल्यानंतर 'तू मला आवडलेली नाही, मला तू मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही, असे म्हणत महेशने मोनिकाचा वारंवार अपमान केला. त्याच्या आईवडिलांनीही 'तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभत नाही' असे मुलीच्या वडिलांना सांगितले आणि लग्न मोडले.
जमलेले लग्न वधु पक्षाकडून मोडल्याने भावी वधूने जीवन संपविल्याची हृदयद्रावर घटना आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये घडली आहे. या प्रकरणा मुलासह त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.