..तर छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही; नगरमधील 'पुणेरी पाटी'नं वेधलं लक्ष | Viral Photo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Photo

..तर छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही; नगरमधील 'पुणेरी पाटी'नं वेधलं लक्ष

देशात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. पेट्रोलनी शंभरी पार केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. संपुर्ण भारतभर वाढत्या इंधन दरवाढीने लोक संतप्त झाले. अशात सोशल मिडियावरही लोक वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून आपली व्यथा मांडत असतात. यातच अहमदनगरच्या पेट्रोल पंपावरील एक पाटी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतंयं. (Ahmednagar notice board on petrol pump goes viral)

हेही वाचा: राज्यातील 'या' जिल्ह्यांत पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पाऊस

अहमदनगर येथील नेवासकर पेट्रोल पंपावर लावण्यात आलेली एक पाटी चर्चेचा विषय ठरली आहे. या पाटीवर वाढत्या पेट्रोल दरावरुन ग्राहकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. या पाटीवर लिहिले आहे, “पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही.” जरी वरवर पाहता हा विनोद वाटत असला तरी वाढत्या इंधन दरामुळे अशी परिस्थिती ओढाऊ शकते, यात कोणतीही शंका नाही.

हेही वाचा: Video: मुंबईत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी, नोकरदारांची तारांबळ

या पाटीवर नेवासकर पेट्रोल पंप असा उल्लेख करण्यात आलाय मात्र ही नेवासकर पेट्रोल पंप व्यवस्थापनानेच लावली की नाही, या बाबत अद्याप माहिती नाही. दरम्यान या व्हायरल पाटीवर, सोशल मीडियावर मात्र जोरदार प्रतिसाद मिळतोय. अनेकांनी ही पोस्ट शेअर करत यावर येत मजेशीर प्रतिक्रियाही दिल्यात.

Web Title: Ahmednagar Notice Board On Petrol Pump Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top