अतिवृष्टीग्रस्तांना NDRFच्या दुप्पट मदत म्हणजे धुळफेक - अजित पवार

शिंदे-फडणवीस सरकारनं सत्तेत येताच पहिल्यांदा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मोठी घोषणा केली होती.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारनं सत्तेत येताच पहिल्यांदा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मोठी घोषणा केली होती. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल अर्थात एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत दिल्याचं सांगण्यात आलं होतं. पण ही दुप्पट मदत म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (aid given by maha govt to flood affected Farmers which is doubling of NDRF is just dust Ajit Pawar)

Ajit Pawar
सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?; अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले!

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीच कॅबिनेट बैठक घेतली आणि जाहीर केलं की, एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत अतिवृष्टीग्रस्तधारकांना दिली. पण एनडीआरएफच्या निकषांतील मदत इतकी तुटपुंजी आहे की त्यातून काही भागत नाही. मागं आम्ही सरकारमध्ये असताना एनडीआरएफच्या निकषांच्या तिप्पट मदत केली होती. सरकारनं मोठ्या आवेशात सांगितलं की, आम्ही एनडीआरएफच्या दुप्पट मदत केली पण ही केवळ धुळफेक आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar
Vande Mataram:'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम'ची सूचना शहांच्या कार्यालयाकडून?; पंकजा मुंडेंचं सूचक विधान

एनडीआरएफचे सर्व निकष हे कालबाह्य झालेले आहेत. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. राज्यात अतिवृष्टीमुळं साधारण १५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. त्यात अजूनही पाऊस सुरु आहे, आजही महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस पडतोय. त्यामुळं १५ लाख हेक्टरवर आणखी नुकसान होऊ शकतं, असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

Ajit Pawar
अमूल, मदर डेअरीचं दूध २ रुपयांनी महागलं; 'या' तारखेपासून होणार दरवाढ

आम्ही सरकारमध्ये असताना, एनडीआरएफच्या निकषानुसार प्रतिहेक्टरी ३,८०० रुपये मदतीचे निकष होते. पण आम्ही यामध्ये भांडी, कपडे, अन्न-धान्य तसेच प्रत्येकासाठी ५ हजार प्रमाणे प्रत्येक कुटुंबाला १५ हजार रुपये दिले होते. तसेच घर पडलेल्यांना दीड लाख रुपये तर नुकसानीसाठी सरसकट ५० हजार रुपयांची मदत केली होती, अशी माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली. दरम्यान, पीककर्जाचा आढावा घेतला तर ऑगस्ट महिना उजाडला तरी टार्गेटपेक्षा निम्मच उद्धीष्ट गाठलं गेल्याच पवार यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com