सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?; अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले!

आमदार संतोष बांगर यांच्याकडून अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणावर अजित पवारांनी केलं भाष्य
Ajit Pawar
Ajit PawarSakal

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणावर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी केलं पत्रकार परिषदेत भाष्य केलं. सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अशा शब्दांत पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले. मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं, अशी मागणीही यावेळी अजित पवारांनी केली. (Ajit Pawar slams rulling party of Maharashtra due to govt official beaten up by MLA Santosh Bangar)

Ajit Pawar
अमूल, मदर डेअरीचं दूध २ रुपयांनी महागलं; 'या' तारखेपासून होणार दरवाढ

उद्यापासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. याच्या पूर्वसंध्येला आज सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांना चहापाण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. या चहापाण्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला. याचं कारण सांगण्यासाठी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच अधिवेशनात विरोधकांकडून कोणते मुद्दे उपस्थित केले जातील, याची माहिती दिली. यावेळी त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा उल्लेख करत सरकार सडकून टीका केली.

Ajit Pawar
SpiceJet flight Smoking : बॉबी कटारियावर FIR; विमानात स्मोकिंग प्रकरणं भोवलं!

अजित पवार म्हणाले, हे सरकार येऊन काहीच दिवस झाले आहेत तरी यांच्यातील काही आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशी भाषा वापरत आहेत. शिवसेनिकांना ठोकून काढा, त्यांचे हात तोडा, हात तोडता नाही आले तर तंगडी तोडा, अरे ला का रे म्हणा, कोथळा काढा अशी भाषा वापरत आहेत, ही काय पद्धत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला काम करतानाचे संस्कार शिकवले. पण हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, भाजपला पटत का? असा सवालही त्यांनी केला.

सरकारला सुनावले खडे बोल

एका शिंदे गटाच्या आमदारानं सरकारच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागला आहात. तुम्ही स्वतःला कोण समजता? सरकार आलं म्हणजे काय मस्ती आली का? कोणीही व्यक्ती असली तरी सर्वांना संविधान, कायदे, नियम सारखेच आहेत. नियमांपेक्षा मोठा कोणीही नाही. मग तो सरकारमध्ये असून द्या किंवा महाराष्ट्रातील शेवटचा माणूस, अशा शब्दांत अजित पवार यांनी बांगर यांच्यासह सरकारला खडे बोल सुनावले.

सरकारनं याचं उत्तर द्यावं - पवार

अजून सरकारची सुरुवातही झाली नाही तर एवढी मस्ती आली आहे. यांना थांबवलं कसं जात नाही? यांना दोन गोष्टी समजावून सांगण्याचं काम संबंधिताचं नाही का? महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यानं बघतोय. आपण स्वांतत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना ज्या दिवशी पंधरा ऑगस्ट आपण आनंदानं साजरा करतो तेव्हा एक आमदार अशी भाषा वापरतो. जर देशाच्या आर्थिक राजधानीत आणि महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही अशी भाषा वापरत असाल तर गावागावत काय परिस्थिती निर्माण होईल. हाच प्रकार नंतर खालपर्यंत पसरला जातो. या गोष्टींकडं सरकारकडून दुर्लक्ष होता कामा नये. याच उत्तर सरकरानं द्यावं, अशी मागणीही यावेळी पवार यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com