Ajit Pawar: 'अजित दादांची गॅरंटी नाही', गोऱ्हेंच्या व्यक्तव्यानंतर गजानन काळेंचा पुन्हा खळबळजनक दावा

शिबिरात गैरहजर राहिल्याने अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राज्याच्या राजकारणात समोर आणि मागे अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान राजकारणात अनपेक्षित राजकीय घडामोडी देखील समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीतील शिबिराच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजारी असताना सहभागी झाले. परंतु त्याचवेळी या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार गैरहजर असल्याचे दिसून आले. यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिबिरात गैरहजर राहिल्याने अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दरम्यान या चर्चांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ‘अजित दादांची गॅरंटी नाही’ असं वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानामुळे मनसे नेते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाबाबत खळबळजनक दावा केला आहे.

पाहिल्यांदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातील गैरहजर राहण्यावर मनसे नेते गजानन काळे यांनी दावा केला होता. “शरद पवार आजारी असून कार्यक्रमात येतात. पण अजित पवार वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात हे पचनी पडत नाही. गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा”, असं गजानन काळे म्हणाले होते.

Ajit Pawar
Ajit Pawar: अजित पवार होणार मुख्यमंत्री? शिंदे गटाच्या नेत्यानं खिल्ली उडवत स्पष्टच सांगितलं..

त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषदेत भाजपच्या पालकमंत्र्यांकडून विरोधकांना निधी दिला जात नाही का? असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर निलम गोऱ्हे म्हणाल्या की, आधी गिरीश बापट पालकमंत्री होते तेव्हाच मला माहिती आहे, म्हणजे मी पाहिलेलं आहे, फक्त आरोप म्हणून आरोप करत नाहीय. गिरीश बापट राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रेमाने निधी द्यायचे. आता तसं राहीलं नाही. कारण आता बरंच पाणी वाहून गेलं आहे. आता महाविकास आघाडी तयार झाली आहे. त्याचबरोबर अजित पवारांची कुणालाच गॅरंटी नाही. परत त्यांना बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा आहे. पूर्वी जसे संताजी-धनाजी दिसायचे तसं आमची मविआ सहकारी दिसत आहेत असं गोऱ्हे म्हणाल्यात.

Ajit Pawar
Ajit Pawar: गुवाहटीच्या वाटेवर लक्ष ठेवा, कुछ तो गडबड है…अजित पवार नाराज? काळेंच्या ट्विटमुळे चर्चा

त्यावर आज पुन्हा मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट केलं आहे. "आम्ही तर कालच म्हणालो होतो आज निलम ताई गोऱ्हे पण म्हणाल्या अजित दादांची गॅरंटी नाही ...काँग्रेसने विरोधी पक्षनेते केले ते विखे पाटील पण असेच गेले होते आता या राज्याचा दुसरा विरोधी पक्ष नेता पण जाण्याची चिन्ह आहेत का ?... मंथन शिबिर जास्तच भारी पडलय अस दिसतय राष्ट्रवादीला ... असा टोला गजानन काळेंनी लगावला आहे.

Ajit Pawar
Solapur : आमदार शहाजी पाटील यांच्या 'त्या' वक्तव्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com