Ajit Pawar: अजित पवार होणार मुख्यमंत्री? शिंदे गटाच्या नेत्यानं खिल्ली उडवत स्पष्टच सांगितलं..

शिंदे फडणवीस सरकार पडेल आणि पुन्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत येईल
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राज्यात सत्तांतर होण्याच्या अनेक चर्चा सुरू आहेत. शिंदे फडणवीस सरकार काही दिवसात पडेल आणि पुन्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत येईल अशा चर्चा सुरू आहेत. अशातच शिंदे फडणवीस सरकार पडेल आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत येईल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील या चर्चेवर शिंदे गटाच्या नेत्याने उत्तर देत खिल्ली उडवली आहे.

शिंदे सरकार कोसळणार म्हणून विरोधक हे दिवसा स्वप्न पाहत आहेत जे की कधीही पूर्ण होणार नाही. 1978 पासून शरद पवार हे राज्यात आतापर्यंत एका विचाराचे सरकार आणू शकले नाहीत. त्यामुळे हे स्वप्नच राहणार ते कदापि पूर्ण होणार, अशी बोचरी टीका शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे.

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान शिवतारे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar: गुवाहटीच्या वाटेवर लक्ष ठेवा, कुछ तो गडबड है…अजित पवार नाराज? काळेंच्या ट्विटमुळे चर्चा

राज्यातले भाजप शिंदे गटाचे सरकार कधीही कोसळेल आणि अजित पवार हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील असं विरोधकांकडून बोललं जात आहे. त्यावर शिवतारे म्हणाले की, 'विरोधक स्वप्न पाहत आहेत. ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. 1978 पासून पवार साहेब हे राज्यात एका विचाराचे सरकार आणू शकले नाहीत त्यामुळे हे स्वप्नच राहणार ते कधीही पूर्ण होणार नाही असं शिवतारे म्हणाले आहेत.

Ajit Pawar
Solapur : आमदार शहाजी पाटील यांच्या 'त्या' वक्तव्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
Pravah Anathalaya founder Rameshwar Gorde honoured with Loknete Late Ajitdada Pawar Award 2026 for social service
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Marathi News Esakal
www.esakal.com