Ajit Pawar: शरद पवारांनी बोलावलेली बैठक बेकायदा, अजितदादांचा मोठा दावा

Ajit Pawar:
Ajit Pawar:
Updated on

Ajit Pawar :   राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडानंतर दिल्लीत ही बैठक बोलावली मात्र अजित पवार यांच्या गटाने या बैठकीला विरोध केला आहे.

मुळ राष्ट्रवादी पक्ष कोणता हा वाद निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे ही बैठक बेकायदा असल्याचे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी पक्षावर दावा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसमध्ये हालचाली वाढल्या आहेत.  

शरद पवार यांना आज बैठक बोलवण्याच अधिकार नाही. दिल्लीतील आज शरद पवार यांच्या बैठकीवर अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे अशी बैठक शरद पवार बोलवू शकत नाही, असे अजितदादा गटाने म्हटले आहे. त्यामुळे या बैठकीत झालेले निर्णय बेकाकायदेशीर असतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar:
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का, ६ आमदार शिंदेंच्या वाटेवर! मुंबईबाहेर भेटायचं ठरलं

अजित पवार गटाचे आक्षेप

मूळ राष्ट्रवादी कोणती? हा वाद निवडणूक आयोगात असल्याने कुणीही बैठक घेऊ शकत नाही.

वादाचा निपटारा होईपर्यंत कुणीही बैठक घेऊ शकत नाही

अजित पवार यांनी राष्ट्रवादी दावा सांगत मोठा डाव खेळला आहे. शपथविधी आधीच अजित पवार यांनी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेत ४० आमदरांच्या सह्या आहेत. ३० जूनला म्हणजे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायच्या दोन दिवस आधीच आयोगाकडे ही याचिका दाखल केली आहे.

Ajit Pawar:
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा राजीनामा, श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद अन् अजित पवार मुख्यमंत्री?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.