esakal | मोदी सरकारकडून पूरग्रस्तांना मदत करताना दुजाभाव; अजित पवारांचे टिकास्त्र
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

केंद्र सरकारचा पूरग्रस्तांना मदत करताना दुजाभाव- अजित पवार

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : केंद्र सरकारकडून (central government) पूरग्रस्तांना मदत करताना दुजाभाव करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पुरामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. राज्य सरकार (maharashtra government) सर्वतोपरी मदत करत असताना केंद्रानेही समान मदत करावी असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अत्यंत नुकसान झाले. या पूरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या (maharashtra flood) मदतीवरून मोदी सरकारवर पवारांनी टिकास्त्र साधले आहे.

पिकविम्याचे पैसे मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील - अजित पवार

जिल्हा प्रशासनाला सर्व माहिती विचारून अजित पवारांनी हा आढावा घेतला आहे. राज्य सरकारतर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पुरविणार असून पिकविम्याचे पैसे मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. ज्या ठिकाणी पोहचता येणार नाही त्या ठिकाणी ड्रोनने सेवा करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या. तसेच पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण होणं महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

कोरोनाचे संकट संपूर्ण टळलेलं नाही

कोरोना व्हायरसचे संकट अद्यापही टळलेलं नसून नागरिकांनी मास्क घालण्यास दिरंगाई करू नये. काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे पवारांनी सांगितले.

हेही वाचा: अखेर ठाकरेंच्या 'या' निर्णयावर राज्यपाल करणार खुषीने सही!

त्रिसदस्यीय प्रभाग समितीला कॉंगेसच्या काही नेत्यांचा विरोध

त्रिसदस्यीय प्रभाग समितीला कॉंगेसच्या काही नेत्यांचा विरोध असून संपूर्ण पक्षाचा विरोध नाही, महापालिका प्रभागावरून दोन्ही काँग्रेसच्या रोषाचा अंत न पाहताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी नव्या प्रभाग पद्धतीचा मसुदा राज्यपालांकडे दिला आहे. त्यावर राज्यपालांच्या सहीची अपेक्षा असल्याचे अजित पवारांनी सांगितले

हेही वाचा: अमित शहांनंतर काँग्रेसमधील नाराज 23 नेत्यांना कॅप्टन भेटणार ?

loading image
go to top