Sharad Pawar: अजित पवारांनी शरद पवारांसाठी स्टेजवर खुर्ची रिकामी ठेवली? फोटो व्हायरल..जाणून घ्या सत्य

Maharashtra Politics Update : व्यासपिठावर एक खुर्ची रिकामी होती. ही खुर्ची शरद पवार यांच्यासाठी रिकामी ठेवण्यात आली आहे, अशा चर्चा सुरू होती
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीमुळे मोठी उलाढाल सुरू झाली आहे. तर पक्षातील आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्या पवारांना पाठिंबा द्यायचा याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार किती आणि शरद पवार यांना पाठिंबा देणारे आमदार कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. त्यासाठी आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी महत्वाची बैठक आयोजित केली आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज ते शक्तीप्रदर्शन करत आहेत. वांद्रे येथील एमईटी कॉलेजच्या मैदानावर राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते आले आहेत.

Sharad Pawar
Chhagan Bhujbal: 'शरद पवारांनी मला भेटायला बोलवलं तर मी…', छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे खळबळ

अजित पवार सुद्धा या मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या कार्यकमामध्ये एका महत्त्वाच्या गोष्टीने लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणजे व्यासपिठावर एक खुर्ची रिकामी होती. ही खुर्ची शरद पवार यांच्यासाठी रिकामी ठेवण्यात आली आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तर सोशल मिडियावर या रिकाम्या खुर्चीचा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.(Latest Maharashtra News)

Sharad Pawar
Sharad Pawar Latest News: 'अश्लाघ्य भाषेत मी...', शरद पवारांच्या विरोधात केलेल्या 'त्या' पोस्टवर तटकरेंचं उत्तर

कार्यक्रमात जमलेल्या अनेकांचे या रिकाम्या खुर्चीने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. शरद पवार यांना अंधारात ठेवून अजित पवार आणि समर्थक आमदार यांनी भाजप-शिवसेना यांच्यासोबत महायुती केल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट पडली. पण आम्ही शरद पवारांना मानतो. ते आमचे मार्गदर्शक आणि गुरु असल्याचे काही नेत्यांनी म्हंटलं आहे.(Latest Maharashtra News)

तर कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळातच शरद पवार यांच्यासाठी रिकाम्या ठेवण्यात आलेल्या खुर्चीवर सुनील तटकरे येऊन बसले. तर अजित पवार गटाकडुन या रिकाम्या खुर्चीबाबत कोणतीही माहीती देण्यात आली नाही.(Latest Marathi News)

Sharad Pawar
Ajit Pawar Latest News : 'अजितदादांना सकाळी भेटले पण...',सुप्रिया सुळेंचं 'त्या' भेटीवर स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eight Sharad Pawar Faction MPs Meet PM Narendra Modi Delimitation Bill Talks Add Fuel to Political Speculation
Sharad Pawar Rules Out NCP Merger Confirms Both Nationalist Congress Parties Will Remain Separate in Maharashtra
First full size statue of Ajit Pawar in Baramati
PM Narendra Modi-Sharad Pawar Meeting |
Marathi News Esakal
www.esakal.com