Ajit Pawar NCP : 'राष्ट्रवादी'च्या नव्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा राडा; कुलूप तोडून केला प्रवेश

नव्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला आहे.
Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCPSakal
Updated on

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्या गटाने त्यांना मिळालेला प्रतापगड बंगला हा राष्ट्रवादीचं कार्यालय म्हणून काल जाहीर केले. पण आज सकाळी हा बंगला ताब्यात घेण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. प्रतापगड हा बंगला A-5 बंगला म्हणूनही ओळखला जातो.

दरम्यान, आज या कार्यालयाच्या चाव्या घेण्यावरून कार्यकर्त्यांचा परिसरात राडा झाल्याची माहिती आहे. पीडब्ल्यूडी चे अधिकारी काल उशिरापर्यंत प्रतापगड बंगल्याची साफसफाई करत होते. साफसफाई झाल्यानंतर संबंधित कर्मचारी हे चावी घेऊन गेले ते उशिरा आल्याने कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Ajit Pawar NCP
Ajit Pawar : ऑफिस मिळाले पण चावी सापडेना! अजित पवार गटाची A-5 बंगल्यावरून झाली गोची

तर चाव्या लवकर आल्या नसल्याने अजित पवार गटाच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली होती. यानंतर वैतागलेल्या काही कार्यकर्त्यांनी थेट कुलूप तोडून या बंगल्यात प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sharad Pawar Rules Out NCP Merger Confirms Both Nationalist Congress Parties Will Remain Separate in Maharashtra
First full size statue of Ajit Pawar in Baramati
NCP Sharad Pawar Group
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com