Ajit Pawar : ना शरद पवार, ना अजित पवार! सरोज अहिरे नाशिकला परतल्या; कारण आलं समोर

Maharashtra Politics: आज शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गटांकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुणाकडे किती संख्याबळ हे स्पष्ट होईल. दोन्ही गटांकडून आमदारांना व्हिप बजावण्यात आलेला आहे.
NCP Saroj Ahire
NCP Saroj Ahireesakal
Updated on

मुंबईः शरद पवार यांच्या अत्यंत जवळच्या असलेल्या नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे नाशिकला परतल्या आहेत. त्यांचं समर्थन नेमकं कोणत्या गटाला, हे स्पष्ट झालेलं नाही. मागील दोन दिवसांपासून सरोज अहिरे नॉट रिचेबल होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या उभी फूट पडली आहे. आज शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गटांकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुणाकडे किती संख्याबळ हे स्पष्ट होईल. दोन्ही गटांकडून आमदारांना व्हिप बजावण्यात आलेला आहे.

NCP Saroj Ahire
Ajit Pawar Latest News : शपथविधीला अजित पवारांसोबत पण शरद पवारांना वडील मानणाऱ्या 'या' महिला आमदार नॉट रिचेबल

अजित पवार यांच्याकडे ४२ आमदारांचं पाठबळ असल्याचं सांगितलं जात आहे. तर शरद पवार यांच्याकडे केवळ ११ आमदार असल्याचं वृत्त 'टीव्ही९' ने दिलं. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, हे समोर येणारच आहे.

NCP Saroj Ahire
Nagpur Police Action : बेपत्ता दोन अल्पवयीन मुलींना शोधण्यात यश; पालकांच्या रागावर सोडले घर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे नाशिकला परतल्याची माहिती आहे. ना शरद पवार, ना अजित पवार.. अशी भूमिका त्यांनी सध्यातरी घेतल्याचं कळतंय.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे ६ आमदार आहेत. त्यापैकी पाच आमदार अजित पवारांसोबत असल्याची माहिती आहे. रात्री उशिरा त्या नाशिकमध्ये परत आल्या आहेत. तब्येत बरी नसल्याचं कारण सांगून सरोज अहिरे नाशिकमध्ये परतल्या असून संध्याकाळी त्या आपली भूमिका स्पष्ट करतील, असं सांगितलं जातंय. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिलंय.

महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गटाकडून ४४ आमदारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आलेलं असून त्यांना आजच्या बैठकीसाठी व्हिप लागू होणार आहे. आज मुंबईतल्या एमईटी कॉलेजमध्ये अजित पवार गटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नेमके किती आमदार उपस्थित राहतात, हे काही वेळात कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com