Ajit Pawar Not reachable: "नॉट रिचेबल नव्हतो तर..."; अजित पवारांनी केला खुलासा

Ajit Pawar
Ajit PawarSakal
Updated on

"सततचे दौरे, जागरण यामुळे मला पित्ताचा त्रास झाला होता, त्यामुळे औषध घेऊन विश्रांती करणे मी पसंत केले. नॉट रिचेबल नव्हतो," असे स्पष्टीकरण विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शनिवारी सकाळी येथे दिले.

पवार हे शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते. या पार्श्वभूमीवर पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या हस्ते खराडीमधील रांका ज्वेलर्सच्या शोरूमचे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उद्घाटन झाले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी 'अजित पवार नॉट रिचेबल' या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले "मी सतत दौरे करत असतो त्यामुळे जागरण होत असतो माणूस आहे कधी आजारी पडू शकतो काल मला पित्ताचा त्रास झाल्यामुळे बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी औषध घेऊन विश्रांती घेतली परंतु माध्यमातून विपर्यास करण्यात आला."

Ajit Pawar
Ajit Pawar Not Reachable: अजित पवार नॉट रिचेबल? पक्षातील 7 आमदारही संपर्काबाहेर; चर्चा-अफवांना उधाण

पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या संदर्भात, कोणत्याही प्रकारची चर्चा महाविकास आघाडी झालेली नाही. याबाबतची चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे. मुळात ही पोट निवडणूक केव्हा होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही, निवडणूक आयोगाने त्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत ते म्हणाले राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सर्वांनाच आपापल्या श्रद्धा जपण्याचा अधिकार आहे. सर्वजण कोठे ना कुठेतरी दर्शनासाठी जात असतात मात्र ते जाताना प्रसिद्धी करणे योग्य आहे का, असा सवाल ही पवार यांनी उपस्थित केला.

Ajit Pawar
Ajit Pawar Not Reachable update: नॉट रिचेबल अजित पवार थेट पुण्यात; गेले होते तरी कुठं?

पुणे महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या नदी सुधार प्रकल्पाबाबत पवार म्हणाले की, या प्रकल्पामुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येणार नाही याची काळजी जलसंपदा विभागाने घ्यावी, त्यासाठी तज्ञांच्या मदतीने उपाययोजना कराव्यात आणि पुणेकरांचे नुकसान होणार नाही असा निर्णय घ्यावा. विकास करताना पर्यावरणाचे ही संतुलन राखणे गरजेचे आहे असे मत पवार यांनी स्पष्ट केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com