Awhad Letter to Prakash Ambedkar: "तर तुम्हाला पुढची पिढी..."; आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना लिहिलं खुलं पत्र

सध्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या समावेशाबाबत संभ्रम कायम आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

मुंबई : सध्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या समावेशाबाबत संभ्रम कायम आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपावरुन मविआतील घटक पक्षांना चांगलंच अडकून ठेवलं आहे. आंबेडकरांच्या जागा वाटपाच्या भूमिकेमुळं त्यांना समजावण्याचा प्रयत्न आता मविआतील नेत्यांनी सुरु केला आहे. त्यात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना खुलं पत्र लिहिलं आहे.

यामध्ये त्यांनी संविधानाची आठवण करुन देताना चर्चेचं आवाहन केलं आहे. अन्यथा पुढील पीढी आपल्याला माफ करणार नाही, असं म्हटलं आहे. (Jitendra Awhad Letter to Prakash Ambedkar next generation will not forgive you)

Prakash Ambedkar
Modi Ka Pariwar: राहुल गांधींमुळं सुरु झालं होतं 'चौकीदार' कॅम्पेन, आता लालूंमुळं 'मोदी का परिवार'; जाणून घ्या भाजपची रणनीती

आव्हाडांनी पत्रात काय म्हटलंय?

मी शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नेते म्हणून म्हणजेच आपणांकडे पाहिले जात आहे. (Marathi Tajya Batmya)

Prakash Ambedkar
PM Modi Praises SC: मोदींनी केलं सुप्रीम कोर्टाचं कौतुक; ट्विट करत म्हणाले 'स्वागतम्'...

आपणांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करू इच्छितो की, तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे अन् त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तरी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात. संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar
Chandigarh Deputy Mayor Elections: महापौरपदासाठी झाला होता गैरप्रकार! आता उपमहापौरपदाची निवडणूक भाजपनं जिंकली

जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करुया !

जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com